Latest

Facebook owner Meta : मार्क झुकेरबर्गला धक्का; एका दिवसात फेसबुकला २३० अब्ज डॉलरचा फटका

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

फेसबुकची पेरेंट कंपनी मेटाच्या (Facebook owner Meta) शेअर्समध्ये गुरुवारी २६.४ टक्क्यांनी घसरण झाली. यामुळे कंपनीचे बाजार मुल्य २३० अब्ज डॉलरने घटले. सोशल मीडिया दिग्गज कंपनी फेसबुकने युजर संदर्भात निराशाजनक अंदाज जारी केल्यानंतर, त्यांचे शेअर्स धडाधड कोसळले. यामुळे कंपनीसोबत फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गची संपत्ती २९ अब्ज डॉलरने कमी झाली आहे.

नॅस्डॅक स्टॉक एक्सचेंजवर (Nasdaq Stock Market) कंपनीचे मुल्य कमी होण्याबरोबरच शेअर बाजारातील चार दिवसांतील तेजी धोक्यात आली. बाजार सुरु होताच लगेच मेटाच्या शेअर्संमध्ये २६.४ टक्क्यांची घसरण झाली. यामुळे कंपनीला २३० अब्ज डॉलरचा फटका बसला. नॅस्डॅक हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा अमेरिकेतील स्टॉक एक्सचेंज आहे.

नॅस्डॅकवर टेक आणि अन्य दिग्गज कंपन्यां आघाडीवर आहेत. पण जानेवारीमध्ये नॅस्डॅकचा शेअर निर्देशांक ९ टक्क्यांनी घसरला होता. याआधी मार्च २०२० मध्ये शेअर निर्देशांक कोसळला होता. त्यानंतर जानेवारीत त्यात मोठी घसरण झाली आहे.

Google नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे डिजिटल जाहिरातीसाठी प्लॅटफॉर्म असलेल्या Meta ने म्हटले आहे की, Apple च्या ऑपरेटिंग सिस्टमवरील गोपनीयता बदलांमुळे कंपनीला फटका बसला आहे.

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी हल्लीच त्यांच्या कंपनीचे नाव बदलून मेटा (Facebook owner Meta) करण्याची घोषणा केली होती. पण यामुळे डेली यूजरमध्ये वाढ न होता त्यात घसरण झाली असल्याचे दिसून आले. फेसबुकच्या १८ वर्षांच्या अस्तित्वानंतर ही पहिलीच अशी वेळ आहे की त्यांचा यूजर बेस कमी झाला आहे.

फेसबुकची पेरेंट कंपनी मेटा (Meta) ने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, फेसबुकने जागतिक पातळीवर २०२१ च्या चौथ्या तिमाहीत सुमारे ५ लाख यूजर गमावले आहेत. या पार्श्वभूमीवर काही तासांत मेटा प्लेटफॉर्म्स इंक (Meta Platforms Inc) च्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. यूजर्सची संख्या कमी झाल्याने त्यांच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. एवढेच नाही तर कंपनीला मिळणाऱ्या जाहिरातींवर त्याचा परिणाम झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT