Latest

लोकसंख्या नियंत्रण कायदा तात्काळ अस्तित्वात आणा; शिंदे गटाची मागणी

मोहन कारंडे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील सर्व नागरिकांच्या मूलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी 'एक कुटुंब, एक मूल' धोरण प्रस्तावित करून तात्काळ लोकसंख्या नियंत्रण कायदा अस्तित्वात आणावा, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने खासदार हेमंत पाटील यांनी नुकतीच शहा यांची भेट घेत पक्षाच्या मागणीचे निवेदन त्यांना दिले.

लोकसंख्या वाढीमुळे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही. अन्न धान्याचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे तांदूळ, गहू सोडून इतर अन्न धान्याची, खाद्यतेलाची जवळ जवळ १ लाख १० हजार कोटीची आयात करावी लागते. पेट्रोलियम पदार्थ, खते, रासायनिक खते या शेतीविषयक मूलभूत गोष्टी करिता दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागते. रस्ते, पूल आणि प्रवासी वाहतूकीच्या सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण करूनही अपुऱ्या पडत आहेत. याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. निवाऱ्याची समस्या कमी करण्यासाठी इमारती वेगाने बांधल्या जात आहेत. ज्यामुळे शेतजमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत. ज्यात पर्यावरणीय समस्या असतील. नैसर्गिक संसाधनांचा नाश वेगाने वाढला आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा लवकरात लवकर अस्तित्वात आणण्याची आवश्यकता असल्याचे पक्षाने निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT