Ravi Kishan : मला चार मुले ही कॉंग्रेसचा दोष; भाजप खासदार रवी किशन यांचं वक्तव्य  | पुढारी

Ravi Kishan : मला चार मुले ही कॉंग्रेसचा दोष; भाजप खासदार रवी किशन यांचं वक्तव्य 

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप खासदार आणि भोजपुरी अभिनेते रवी किशन (Ravi Kishan) यांचं एक वक्तव्य चर्चेत आले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, “काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणले असते तर आज मी 4 मुलांचा बाप नसतो”. भारतात वाढती लोकसंख्या ही एक समस्या बनली आहे. देशभरात खासगी विधेयक असलेल्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकाची सध्या चर्चा (Population Control Bill) सुरु आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशमधील गोरखपूरचे भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन यांचं एक वक्तव्य खूप चर्चेत आले आहे.

एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कॉंग्रेस पक्षावर आरोप केला आहे. ते म्हणाले की, “मला चार मुले आहेत, माझा कोणताही दोष नाही. काँग्रेस सरकारने विधेयक आणले असते, कायदा असता तर आम्हाला चार अपत्ये झाली नसती.” रवी किशन यांना तीन मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्यं आहेत.

काँग्रेस पक्षावर निशाणा 

आधीच्या सरकारने या बाबतीत वाढत्या लोकसंख्येच्या बाबतीत अधिक दक्ष राहायला हवे होते. काँग्रेसच्या काळात लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती झाली नाही, त्यामुळे आता भाजप सरकारला लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणावे लागले आहे. आता लोकसंख्या नियंत्रणाचा विचार केल्याने चार अपत्ये झाल्याचा पश्चाताप होत असल्याचे त्यांनी मान्य केले.

मला चार मुले आहेत. वडील म्हणून त्यांचे संगोपन मला माहीत आहे. माझा संघर्षही त्यांच्या संगोपनातच होता. ते पुढे म्हणाले की, चीनने लोकसंख्या नियंत्रित केली आहे. आपल्या देशातील पूर्वीची सरकारे विचारी असती तर पिढ्यानपिढ्या संघर्ष करावा लागला नसता. सध्याचे भाजप सरकार केवळ मंदिरेच बांधत नाही तर रस्तेही बांधत आहे.

हेही वाचा 

Back to top button