भोरला 30 ग्रा.पं.मध्ये राजकीय पडघम; काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येच खरी लढत | पुढारी

भोरला 30 ग्रा.पं.मध्ये राजकीय पडघम; काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येच खरी लढत

भोर; पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यात 54 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 163 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 55 जणांनी माघार घेतली असून 30 सरपंचपदासाठी 108 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 22 ग्रामपंचायतींचे सरपंच तर 24 ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच बिनविरोध झाले असून 30 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यांच्या निवडणुका लागल्या असल्यामुळे गावागावात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये लढत दिसत आहे. आता येथे राजकीय पडघम वाजायला सुरुवात झाली आहे.

भोर तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे राजकीय वातावरण तापायला लागले आहे. दरम्यान कोळवडी आणि वाढाणे ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल नसल्यामुळे दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहणार आहे. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 596 अर्ज दाखल झाले होते. यापैकी छाननीत 4 अर्ज बाद झाल्याने 592 उमेदवारी अर्ज राहिले होते. 118 जणांनी अर्ज मागे घेतल्याने 30 ग्रामपंचायतींच्या 90 प्रभागातील 214 जागांसाठी 374 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 54 ग्रामपंचायतीत 20 सदस्यांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत.

अनेक गावात सरपंचपदासाठी अत्यंत चुरशीच्या लढती होणार असून अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सरपंचपदासाठी कर्नावड, कारी, अंगसुळे, वाठार हि.मा, आंबेघर, पसुरे, राजघर, हर्णस, कासुर्डी गु. मा., वागजवाडी, कुरुंगवडी म्हसर बुद्रुक, करंदी खे.बा. येथे मोठ्या चुरशीच्या लढत आहेत. ही ग्रामपंचायत निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगीत तालीम असून प्रत्येक गावातील राजकीय नेते ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत असून भोर तालुक्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती
रावडी, कोर्ले, भावेखल, आपटी, बसरापूर, हातनोशी, सांगवी वि. खो., डेहेणकोंडगाव, पांगारी नानावळे, वेळवंड, कुंबळे, भुतोंडे, गृहिणी, मळे, करंदी खुर्द, विरवाडी, खडकी, सोनवडी, म्हसर खुर्द, करंजगाव, गुढे, तर कोळवडी आणी वाढणे येथील सरपंचपद रिक्त राहिले असून सदस्य बिनविरोध झाले आहेत.

सरपंचपदासाठी दाखल अर्ज
कर्नावड सरपंचपदासाठी 2 अर्ज, कारी 2, सांगवी तर्फे भोर 2, म्हाकोशी 2, आंगसुळे 2, निगुडघर 2, वाठारहिमा 4, आंबेघर 3, बारे खुर्द 2, येवली 2, शिरवली तर्फे भोर 2, पसुरे 2, राजघर 2, भांबवडे 3, वाठारहिंगे 4, वागजवाडी 5, ब—ाम्हणघर 4, हर्णस 2, करंदी बुद्रुक 2, तेलवडी 4, कासुर्डी गु.मा. 5, सांगवी हि.मा. 3, पारवडी 2, कुरुंगवडी 2, सांगवी खुर्द निधान 3 आणि सांगवी बुद्रुक 2 यासाह म्हसर बुद्रुक येथील 7 जागांसाठी 10 अर्ज सरपंचपदाठी 5, करंदी खे.बा. 3 आणि हरिश्चंद्री 3.

Back to top button