Latest

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा निर्णय योग्यच – नारायण राणे

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) सेनेकडून वेळोळी वाईट वागणूक दिली जात होती. आनंद दिघेंच्या बाबतीत जे काही घडलं त्याचा थोडासा विचार करावा. शिंदे यांनी पक्षांतराचा घेतलेला निर्णय योग्यच आहे, अशा शब्दात भाजपचे नेते नारायण राणे यांनी मत व्यक्त केले. शिंदे हिंदुत्वासोबतच येतील, त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करत आहे, असे मत देखील राणे यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

तुला मुख्यमंत्री बनवतो असं सांगून उद्धव ठाकरेंनी आपला शब्द मोडला

तुला मुख्यमंत्री बनवतो असं सांगून अनेकवेळा उद्धव ठाकरेंनी आपला शब्द मोडला. शब्द द्यायचा माहित आहे, पण पाळायचा माहित नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंमध्ये नैतिकता नाही, अशी टीका नारायण राणे यांनी यावेळी केली. बाळासाहेबांनी पक्ष वाढवला, पण उद्धव ठाकरेंना ते जमलं नाही. महाराष्ट्रात आता मविआ सरकारचे अस्तित्व राहिलेलं नाही. सरकार अल्पमतात असल्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणेच योग्य राहील. असे मत यावेळी राणे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रात सध्या राजकीय भुकंप घडला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत पक्षांतर करणार असल्याची चर्चा सध्या जोरदार आहेत. राणे यांनी हा निर्णय योग्यच आहे असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी मविआ सरकारवर टीका देखील केली. संजय राऊत यांचा आवाज का बसला आहे? आता ते का काहीच बोलत नाहीत? असा खोचक सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT