पिंपरी: दिंडीप्रमुखांना प्रथमोचार पेटी, कापडी पिशवी भेट देणार | पुढारी

पिंपरी: दिंडीप्रमुखांना प्रथमोचार पेटी, कापडी पिशवी भेट देणार

पिंपरी : आषाढीवारी पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांची यात्रा सुलभ व आरोग्यदायी व्हावी यासाठी दिंडीप्रमुखांना महापालिकेच्या वतीने प्रथमोपचार पेटी व संपर्क माहिती पुस्तिका भेट देण्यात येणार आहे. तसेच, 10 हजार कापडी पिशव्यांचे वितरण केले जाणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सोमवारी (दि.20) सांगितले. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मंगळवारी (दि.21) आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे बुधवारी (दि.22) शहरात आगमन होत आहे.

या वेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, उपायुक्त विठ्ठल जोशी, सचिन ढोले, रविकिरण घोडके, मुख्य अग्नीशमन अधिकारी किरण गावडे उपस्थित होते. प्रथमोपचार पेटीमध्ये थंडी, ताप, सर्दी व खोकल्याच्या गोळ्या, मलम, बँडेज, सावलोन लिक्विड, ओआरएस पावडर अशा 15 वस्तूंचा समावेश आहे. दरम्यान, आयुक्त पाटील यांनी वारकर्‍यांच्या सेवेसाठी अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, पिण्याच्या पाण्याचे टँकर यांना मार्गक्रमण करण्यासाठी हिरवा झेंडा दाखविला.

Back to top button