Latest

डोंबिवली : आधारवाडी जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव; ४० जणांना लागण 

backup backup

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा

ओमायक्रोनचे रुग्ण वाढत असतानाच कल्याण येथील आधारवाडी जेलमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये कोरोनाने शिरकाव केला असून जेल मधील ४० कैद्यांसह काही जेल कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

आधारवाडी जेलमध्ये सध्या १५०० हून कैदी असून यापैकी ४० कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्व कैद्यांची तब्येत सध्या ठीक असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. उर्वरित सर्व कैद्यांचे पोषण उत्तमरित्या व्हावे यासाठी उत्तम आहार देण्यात येत असल्याची माहिती जेल अधिक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली. कारागृहातील सर्वच  कैद्यांचे कोविड लसीकरण पूर्ण झाले आहे. तर कालपासून बूस्टर डोस देण्याचे सुरु असतानाच हा प्रकार समोर आला असून कोविड रुग्ण सापडल्यानंतर जेलमध्ये सॅनिटायजेशन करण्यात आले आहे.

जेलमध्येही विलगीकरण कक्ष

एखाद्या कैद्याला थंडी-ताप आल्यास जेलमध्ये विलगीकरण कक्षही बनवण्यात आला असून कोरोनाची लक्षणे असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात याठिकाणी ठेवण्यात येते. तसेच डॉन बोस्को शाळेमध्येही विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून नविन कैद्यांना त्याठिकाणी ठेवले जात असल्याची माहिती जेल अधिक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT