Latest

याला म्हणतात स्वामीनिष्ठा..! मूळ मालकाच्‍या शाेधात श्‍वानाने २७ दिवसांत ६४ किलोमीटर अंतर पार केले

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : असं म्हणतात की कुत्र्यासारखा प्रामाणिक प्राणी कोणताही नाही. आपल्या मालकाला लळा लावणारा पाळीव प्राणी मानला जातो. तुम्ही काहीवेळा ऐकलही असेल की, पाळीव कुत्र्याला दुसऱ्याच्या घरी काही दिवस ठेवलं तर ताे अआपल्‍या मूळ मालकाचा शाेध घेत परत घरी येताेच. अशीच एक घटना उत्तर आयर्लंडमधील काउंटी टायरोन येथे घडली आहे.  कूपर नावाचा कुत्रा आपल्‍या मालकाच्‍या शाेधात सलग २७ दिवस ६४ किलोमीटरचा चालत प्रवास करत आपल्या मालकाच्या घरी पुन्हा परत आला आहे. कूपरच्‍या मालकप्रती असणार्‍या प्रेमाची सोशल मीडियावर जाेरदार चर्चा सुरु आहे. (Dog's Love)

 'मेट्रो'च्या रिपाेर्टनुसार, कूपर (गोल्डन रिट्रीव्हर) याच्‍या मूळ मालकाने त्‍याला उत्तर आयर्लंडमधील काउंटी टायरोन येथे पाठवले. मात्र  नवीन घरी पाेहचताच त्‍याने कारमधून धूम ठाेकली. नवीन मालकाच्‍या घरी जाण्‍यापूर्वीच पळून गेला. तो त्याच्या मूळ मालकाकडे २७ दिवस चालत गेला. या २७ दिवसात त्याने तब्बल ६४ किलोमीटर अंतर कापलं.  या काळात कुपरला त्याच्या घरचेही शोधत होते; पण तो सापडला नाही.

Dog's Love : कूपर गमावणे ही 'भीती' वाटत होती

कुपरचा नवा मालक निगेल फ्लेमिंग एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला, कूपरला मी गमावेल की काय, अशी भीती  वाटत होती.  मी मॉली नावाचा कुत्रा विकत घेतला होता. त्याला कंपनी म्हणून मी कपुरला विकत घेतलं होतं. पण ताे त्‍याच्‍या मूळ मालकाकडे परत गेला.

कूपर सुरक्षित आहे 

कूपरच्या नवीन मालक निगेल फ्लेमिंग सांगितले आहे की, " कूपर आता सुरक्षित" आहे . जेव्हा कुपर हरवला तेव्हा मला दिलेल्या मदतीमुळे माझा मानवतेवरचा विश्वास पुन्हा वाढला आहे.  कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT