पुणे : पाळीव श्वानाला दगड मारणे पडले महागात | पुढारी

पुणे : पाळीव श्वानाला दगड मारणे पडले महागात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पाळीव श्वानाला दगड मारल्याने झालेल्या वादातून एकावर कुर्‍हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना बाणेर येथे घडली. या प्रकरणी श्वानाच्या मालकास चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अयुब बाशा शेख (वय 36, रा. शिंदे मळा, कपील मल्हार सोसायटीजवळ, बाणेर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख याने केलेल्या हल्ल्यात रवी घोरपडे (वय 40, रा. शिंदे मळा, कपील मल्हार सोसायटीजवळ, बाणेर) गंभीर जखमी झाला आहे.

शेख बिगारी काम करतो. घोरपडे रंगारी आहे. दोघे शिंदे मळा भागातील वस्तीत राहायला असून, एकमेकांचे परिचित आहेत. घोरपडे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिंदे मळा परिसरातून निघाला होता. त्या वेळी शेख याचा पाळीव श्वान घोरपडे याच्यावर भुंकला. घोरपडेने श्वानाला दगड मारला. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. शेखने घोरपडे याच्यावर कुर्‍हाडीने वार केले. यात घोरपडे गंभीर जखमी झाला.

Back to top button