Latest

“राज्यपालांना काही समज आहे का?”, राज ठाकरेंचा कोश्यारी यांना सणसणीत टोला

backup backup

पुणे, पुढारी ऑनलाईन : "महाराष्ट्रातील राजकीय पक्ष जातीत गुंतवून ठेवतात. इतिहासात नाही. राज्यापालांना काही समज वैगेरे काही आहे का? ते ज्योतिशासारखे आहेत. तुम्हाला शिवरायांबद्दल काही माहीत आहे का? संबंध नसताना शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं. राज्यपालांना नको तिथं बोटं घालायची सवय आहे. त्यांना शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींबद्दल काही माहीत आहे का? महापुरूषांना बदनाम करणे, हाच यांचा उद्योग आहे", अशी थेट टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली.

पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते. त्यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, "निवडणुका आता दिवाळीनंतरच होणार. पावसाळ्यात निवडणुका घेणार आहात का? काय चाललंय राज्यामध्ये हेच कळत नाही. निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसींच राजकारण केलं जातंय. आजचं भाषण हे फक्त ट्रेलर आहे. संपूर्ण चित्रपट २ एप्रिलला शिवतिर्थावर असेल. आता प्रत्येक जण म्हणतो की आम्हाला संपवण्याचा डाव… राजकारणात ते संजय राऊत कसली भाषा वापरताहेत. कसेही बरळताहेत", असे बोलत राज ठाकरे यांनी शिवसेना नेता संजय राऊत यांची नक्कल करत थेट टीका केली.

"युक्रेन आणि रशियाच्या युद्धावर बोलण्यापेक्षा तुमच्या घरातलं बघा. आजही आत्महत्या होत आहेत. महिला आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न कोण सोडवणार? लोकं आपले प्रश्न घेऊन जे आमच्याकडे येतात ना… हीच आपली १६ वर्षांची कमाई आहे. महाराष्ट्र सैनिक कोरोनाची कसलीच भिती न बाळगता लोकांपर्यंत पोहोचला. लोकं त्यांच्याकडे विश्वासाने येत होते. तुमच्यातील जी महाराष्ट्रासाठी काही करायची आग आहे ना… ती विझू देऊ नका. शिवजयंती हा माझ्या राजाचा सण आहे. शिवजयंती तिथीनुसारच साजरी व्हायला हवी. शिवरायांमुळे आपली खरी ओळख आहे. शिवरायांच्या भूमीत आम्ही राहतो, त्यामुळे २१ मार्चला शिवजयंती साजरी करा", असं आवाहनदेखील राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना केली.

मनसेचे नेते बाळ नांदगावकर म्हणाले की, "मुंबई-पुण्यातलं वातावरण बदलतंय, हे लक्षात येतंय. मनसेचं १६ वं वरीस धोक्याचं, मनसेसाठी मोक्याचं. आता फक्त लढायचंच नाही, तर जिंकायचंच. निवडणुका लढायच्याच नाही, तर जिंकण्याासाठीच लढायच्या. हम होंगे कामयाब… मन मैं हो विश्वास पूरा है विश्वास… आमच्या आमदार, खासदार नसले तरी आमच्याकडे निर्माता आहे", असा विश्वास बाळ नांदगावकर यांनी व्यक्त केला.

पहा व्हिडिओ : आरक्षणाचा पेच | Pudhari Podcast

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT