Latest

Disney Plus Hotstar : क्रिकेट चाहत्यांसाठी दिवाळी! आता वर्ल्डकप, आशिया कप पाहता येणार फ्री

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉटस्टारच्या वापरकर्त्यांना आशिया कप २०२३ आणि ICC पुरुष क्रिकेट वन-डे वर्ल्डकप २०२३ चे सर्व सामने अॅपवर विनामूल्य पाहता येणार आहे. असे  OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar ने शुक्रवारी (दि. ९) जाहीर केले.  (Disney Plus Hotstar)

हॉटस्टार जिओ सिनेमाप्रमाणे व्ह्यूअरशिप वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे करून डिस्ने + हॉटस्टारला भारतातील जिओ सिनेमाच्या वाढीला आव्हान द्यायचे आहे. Jio Cinema ने IPL 2023 चे सर्व सामने मोफत दाखवले होते, ज्यामुळे जिओ कंपनीला विक्रमी प्रेक्षकसंख्या मिळाली होती. (Disney Plus Hotstar)

सामना पाहण्यासाठी वापरकर्त्यांना सबस्क्रिप्शनची आवश्यकता नाही

Disney+Hotstar देखील आता आशिया चषक आणि वन-डे वर्ल्डकप स्पर्धेचे सर्व सामने विनामूल्य दाखवून विक्रमी प्रेक्षकसंख्या मिळविण्याचा विचार करत आहे. जे वापरकर्ते Disney+ Hotstar अॅप वापरतात त्यांना आशिया कप आणि विश्वचषक सामने पाहण्यासाठी कोणत्याही सदस्यत्वाची आवश्यकता नाही.

आशिया कप सप्टेंबरमध्ये आणि वन-डे वर्ल्डकपचे सामने रंगणार ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये

वापरकर्ते मोबाईलवरून Disney+Hotstar अॅप इन्स्टॉल करून दोन्ही स्पर्धांचे सर्व सामने विनामूल्य पाहू शकतात. ५४ कोटींहून अधिक मोबाईल यूजर्सला याचा फायदा होईल, असा कंपनीचा दावा आहे. आशिया कप सप्टेंबरमध्ये आणि वन-डे वर्ल्डकप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे.

डिस्ने + हॉटस्टारचे प्रमुख म्हणाले…

डिस्ने + हॉटस्टारचे प्रमुख सजिथ शिवनंदन म्हणाले, "आमची कंपनी भारतातील वेगाने वाढणाऱ्या OTT उद्योगात आघाडीवर आहे. आम्ही आतापर्यंत दर्शकांचा अनुभव वाढवण्यासाठी अनेक नवकल्पना सादर केल्या आहेत, ज्याद्वारे आम्ही आमच्या दर्शकांना जागतिक स्तरावर आनंदित केले आहे.

आम्ही आता आशिया चषक आणि ICC पुरुष वन-डे वर्ल्डकपचे सर्व सामने प्रेक्षकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देत आहोत. आम्हाला विश्वास आहे की असे केल्याने कंपनीला संपूर्ण इको-सिस्टम विकसित करण्यात मदत होईल.

IPL फायनलमध्ये Jio सिनेमाला विक्रमी मिळाली प्रेक्षकसंख्या

अलीकडेच लाँच केलेली नवीन स्ट्रीमिंग अॅप Jio Cinema ने इंडियन प्रीमियर लीग २०२३ फायनलसाठी ३२ दशलक्ष दर्शकांची विक्रमी संख्या गाठली. जो जगातील लाइव्ह स्ट्रीमिंग इव्हेंटचा सर्वाधिक दर्शकांचा विक्रम आहे.
IPLचे स्ट्रीमिंग अधिकार २.९ बिलियन डॉलरमध्ये विकत घेतले

Jio Cinema अॅप हे IPL 2023 चे अधिकृत स्ट्रीमिंग पार्टनर होते. रिलायन्सच्या Viacom-18 ने 2023 ते 2027 या कालावधीत सुमारे २.९ अब्ज डॉलर (रु. २३ हजार ९१७ कोटी) मध्ये IPL डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले, जे पूर्वी Disney कडे होते.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT