Latest

The Kashmir Files चं प्रमोशन नाकारलं, दिग्दर्शकाचा कपिल शर्मावर आरोप

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा आगामी 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज होताच तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. सध्या 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सर्व कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. परंतु, याच दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी कपिल शर्मा याच्यावर आरोप चित्रपटाच्या प्रमोशनास त्यांनी नकार दिल्याचा खुलासा केला आहे.

नुकतेच द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चित्रपटाचे शूटिग संपले असून यातील कलाकार प्रमोशनमध्ये बिझी आहेत. काही दिवसांपूर्वी 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी स्क्रीनिंगला उपस्थित असणाऱ्या चाहत्यांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या.

यावेळी एका चाहत्याने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना चित्रपटाचे प्रमोशन 'द कपिल शर्मा' शोमध्ये करण्याचा सल्ला दिला. यावर दिग्दर्शकांनी कपिल शर्मावर आरोप करत त्यांनी प्रमोशनास नकार दिल्याचा खुलासा केला. दिग्दर्शकांनी याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ती सध्या खूपच चर्चेत आहे.

या पोस्टमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले आहे की, 'द कपिल शर्मा शो' च्या टीमकडे आम्ही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बोलणी केली होती. परंतु, त्यांनी आम्हाला नकार दिला. त्यांनी आम्हाला शोमध्ये बोलवले नाही. कारण आमच्या चित्रपटामध्ये कोणताही मोठा स्टार नाही. तर मी ठरवू शकत नाही की कपिलनं त्याच्या शोमध्ये कोणाला आमंत्रण केलं पाहिजे. हा त्याचा आणि कार्यक्रमाच्या निर्मात्यांचा निर्णय आहे.' असे म्हटले आहे.

या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक यानी भूमिका साकरल्या आहेत. या चित्रपटाची कथा ९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि हत्येवर आधारित आहे. हा चित्रपट ११ मार्च २०२१ रोजी रिलीज होणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT