Latest

Delhi liquor policy: मनीष सिसोदियांच्‍या अडचणीत वाढ; दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणातील संशयित आरोपी, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणात सीबीआयने  सिसोदिया यांच्‍यासह आणखी एकावर आज (दि.२५) न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने दिल्ली मद्य धोरण प्रकरणात आज (दि.२५) दुसरे आरोपपत्र दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात दाखल केले. सीबीआयने या प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यासह हैदराबादस्थित सीए बुची बाबू गोरंटला यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपत्रात अर्जुन पांडे आणि अमनदीप सिंग धल यांच्‍या नावांचा समावेश आहे. संशयित आरोपींवर आयपीसीच्या १२० बी, २०१ आणि ४२० तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, ७ए, ८ आणि १३ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने आरोपपत्राच्या दखलपात्र मुद्यांवर १२ मे रोजी पुढील सुनावणी  होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :
SCROLL FOR NEXT