liquor policy case in Delhi: मनीष सिसोदिया यांच्‍या सीबीआय कोठडीचा आदेश न्‍यायालयाने राखून ठेवला

( मनीष सिसोदिया संग्रहित छायाचित्र )
( मनीष सिसोदिया संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : दिल्‍लीचे उपमुख्‍यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेता मनीष सिसोदिया यांच्‍या सीबीआय कोठडीबाबतचा आदेश आज ( दि. २७ ) दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने आदेश राखून ठेवला आहे. लवकर न्‍यायालय आपला निकाल सुनावणार आहे.

सीबीआयने केली होती पाच दिवसांच्‍या कोठडीची मागणी

आज दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सिसोदिया यांना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले. सीबीआयचे विशेष न्‍यायाधीश एमके नागपाल यांच्‍याकडे सिसोदिया यांना पाच दिवसांची कोठडीची मागणी सीबीआयच्‍या वतीने करण्‍यात आली.  तपासात असे स्‍पष्‍ट झाले की, सिसोदिया यांनी तोंडी सूचना देवून सचिवांना धोरणात बदल करण्‍याचे निर्देश दिले होते. मद्य विक्रीतील नफा मार्जिन हे ५ टक्‍क्‍यांहून १२ टक्‍क्‍यांवर नेला गेला. हा बदल नेमका का करण्‍यात आला याबाबत सिसोदिया यांना योग्‍य खुलासा करता आलेला नाही.हे संपूर्ण प्रकरण लाभाच्‍या हेतूनचे झाले आहे. असेही या वेळी सीबीआयच्‍या वकीलांनी सांगितले.या प्रकरणाच्‍या सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडी देण्‍यात यावी, अशी मागणी सीबीआयने न्‍यायालयात केली.

 मद्य धोरणाला दिल्‍लीतील नायब राज्‍यपालांनी मंजूर दिली  : सिसोदियांचे वकील

यावेळी ज्येष्ठ वकील दयान कृष्णन यांनी सिसोदिया यांच्या बाजूने युक्‍तीवाद केला. ते म्‍हणाले, रिमांडबाबत देण्‍यात आलेले कायद्याचे अजिबात योग्य नाही. नफ्याच्या मार्जिनबद्दलचे नव्‍या मद्य धोरण दिल्‍लीतील नायब राज्‍यपालांनी मंजूर केले होते. सिसोदिया यांनी आजवर चौकशीत नेहमीच सीबीआयला संपूर्सण हकार्य केले आहे. सीबीआयने ऑगस्‍ट २०२२ मध्‍ये सिसोदियांच्‍या घरासह कार्यालयाची झडती घेतली होती. १९ सप्‍टेंबर २०२२ रोजीच त्‍यांनी सीबीआयकडे फोन सोपवला आहे. आता सीबीआयने म्‍हणत आहे की सिसोदिया चुकीची माहिती देत आहे. आमचे यापुढील सर्व चौकशीला सहकार्य असेल, असेही त्‍यांनी सांगितले.

सिसोदिया २०२० पासून वापर असलेल्‍या फोनसंदर्भात आम्‍ही त्‍यांना विचारणा करत आहेत, असे सीबीआयने यावेळी स्‍पष्‍ट केले. सीबीआयने दावा केला आहे की सिसोदिया यांनी ४ फोन वापरले आहेत. यातील तीन नष्‍ट केले आहेत. सिसोदिया आपले वापरलेले फोनची विक्री करु शकत नाहीत. त्‍यांना कुठे माहित होते की, सीबीआय त्‍यांना अटक करुन फोनबद्‍दल विचारणा करणार आहे, असा युक्‍तीवाद सिसोदियांचे वकील कृष्‍णन यांनी केला.

सिसोदियांच्‍या वतीने युक्‍तीवाद करताना ज्‍येष्‍ठ वकील मोहित माथूर म्‍हणाले की, दिल्‍लीसाठी नवे मद्‍य धोरण हे नायब
राज्‍यापलांच्‍या (एलजी ) कार्यालयात पोहोचल्यानंतरच अंतिम टप्प्यात आले. एलजींची त्याला मान्यता दिली. मर्जिन
५ टक्‍क्‍याहून १२ टक्‍के करण्‍याबाबत एलजीला पाठवलेल्या नोटचा हा भाग होता.

रविवार, २६ रोजी तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर केंद्रीय गुन्हे अन्वेशन (सीबीआय) विभागाने रविवारी (दि.२६) सायंकाळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. मद्य घोटाळाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांच्या पथकाला पाचारण करून, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आज त्यांना दिल्लीतील राऊज एवेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. मनीष सिसोदिया यांना सीबीआयचे विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांच्यासमोर हजर करण्यात आले. दरम्यान सिसोदिया यांचे वकील वरिष्ठ अधिवक्ता दयान कृष्णन, सिद्धार्थ अग्रवाल आणि मोहित माथूर हे देखील न्यायालयात हजर होते.

नायब राज्‍यपाल व्हीके सक्सेनांनी केली होती सीबीआय चौकशीची शिफारस

दिल्‍लीतील नवीन मद्‍य धोरणांतील भ्रष्‍टाचार प्रकरणी जुलै २०२२ मध्ये दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची शिफारस केली. सक्सेना यांनी सिसोदिया यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर ईडी आणि सीबीआयने सिसोदियाविरुद्ध तपास सुरू केला.

आपच्‍या कार्यकर्ते उतरले रस्‍त्‍यावर, पक्षाच्‍या कार्यालयाबाहेर निदर्शने

मनीष सिसोदिया यांच्‍या अटकेच्‍या निषेधार्थ आज सकाळपासून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्‍यांनी पक्ष कार्यालयाबाहेर केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. यावेळी महिला कार्यकर्ता आणि महिला पोलिसांमध्‍ये धक्‍काबुक्‍कीचे प्रकार घडले. यावेळी आपच्‍या नेत्‍यांसह शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्‍यात आली. दरम्‍यान, दिल्‍ली पोलीस आपच्‍या कार्यालयात दाखल झाले. त्‍यांनी नेत्‍यांसह कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

सिसोदिया अटकेसाठी 'आप'ने भाजपला धरले जबाबदार

आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेसाठी आम आदमी पक्षाने भाजपला जबाबदार धरले आहे. लोकशाहीसाठी हा काळा दिवस असल्याचं आम आदमी पक्षाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. लाखो मुलांचे भविष्य घडवणाऱ्या जगातील सर्वोत्तम शिक्षणमंत्र्यांना भाजपने एका खोट्या प्रकरणात अटक केली. या घटनेवर अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकार प्रामाणिक लोकांना अडकवत आहे, त्यांच्यावर कारवाई करत आहे, तर भाजप घोटाळे करणाऱ्यांना संरक्षण देत आहे, असे म्हटले आहे.

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, आम आदमी पार्टीला चिरडण्याचा हा प्रयत्न आहे. याची स्क्रिप्ट भाजपच्या मुख्यालयात लिहिली गेली असून, तपास यंत्रणा भाजपचे एक युनिट म्हणून काम करत आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेविरोधात आम आदमी पार्टी आज देशभरात निदर्शने करणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news