Latest

सिसोदियांविरोधातील ‘ईडी’च्या आरोपपत्रावर १० मे रोजी सुनावणी

नंदू लटके

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अबकारी धोरणातील कथित घोटाळा प्रकरणात ( Delhi excise policy case ) सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या आरोपपत्रावरील सुनावणी आज ( दि. ६ ) टळली. 'ईडी'ने सिसोदियांविरोधात दाखल केलेल्या पूtum[ आरोपपत्राची दखल घेण्यासंबंधी राऊज एवेन्यू न्यायालयातील सुनावणी आता १० मे ला घेण्यात येईल.विशेष म्हणजे, ईडीने अबकारी धोरणासंबंधी चौथे पूरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.

अबकारी धोरण घोटाळ्यात सिसोदिया २९ वे आरोपी आहेत, असे पूरवणी आरोपपत्र दाखल करतांना ईडीने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने आरोपपत्राची सॉफ्ट कॉपी ८ मे पर्यंत दाखल करण्याचे आदेश दिले. सिसोदिया राज्य उत्पादन शुल्क मंत्री असतांना आबकारी घोरण घोटाळ्यात आतापर्यंत ६२२ कोटींचे गुन्हे उघडकीस आले असल्याचे ईडीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ईडीने या प्रकरणात सिसोदियांना ९ मार्चला तिहाड कारागृहातून अटक केली होती. आतापर्यंत या प्रकरणात सिसोदियांसह ११ जणांना अटक करण्यात आली असून अद्यापही तपास सुरू आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT