‘खलिस्तान कमांडो फोर्स’चा म्‍होरक्‍या परमजीत पंजवारची पाकिस्‍तानमध्‍ये हत्‍या

खलिस्तान कमांडो फोर्स या दहशतवादी संघटनेचा म्‍होरक्‍या परमजीत सिंग पंजवार. (संग्रहित छायाचित्र )
खलिस्तान कमांडो फोर्स या दहशतवादी संघटनेचा म्‍होरक्‍या परमजीत सिंग पंजवार. (संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : खलिस्तान कमांडो फोर्स ( Khalistan Commando Force ) या दहशतवादी संघटनेचा म्‍होरक्‍या परमजीत सिंग पंजवार याची आज (दि.६)  लाहोरमध्ये गाेळ्या झाडून हत्या करण्यात आली. शहरातीलर सनफ्लॉवर सोसायटीत ही घटना घडली. परमजीत याने १९९० पासून पाकिस्‍तानमध्‍ये आश्रय घेतला होता. तो पाकिस्‍तानची गुप्‍तचर संस्‍थेचा (आयएसआय) उजवा हात मानला जात असे.

९०च्‍या दशकात घेतला होता पाकिस्‍तानमध्‍ये आश्रय

पंजाबमधील अमृतसर जिल्‍ह्यातील पंजवाड गावातील मूळचा रहिवासी असणारा परमजीत पंजवार याने ९०च्‍या दशकात पाकिस्‍तानमध्‍ये आश्रय घेतला होता. ५७ वर्षीय परमजीत याच्यावर देशद्रोह, खून, कट रचणे, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि दहशतवादांना मदत आदी आरोप होते. माजी लष्करप्रमुख जनरल एएस वैद्य यांची हत्‍या आणि लुधियानामधील देशातील सर्वात मोठ्या बँक चोरीप्रकरणातील तो आरोपी होता. पाकिस्‍तानमध्‍ये पंजवार हा मलिक सरदार सिंग नावाने वावरत होता. आज ( दि. ६) सकाळी सहा वाजता लोहार शहरातील सनफ्‍लॉवर सोसायटीत मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्‍याच्‍या गोळीबार केला. या हल्‍यात तो जागीच ठार झाला.

Khalistan Commando Force : पाकिस्‍तानमधील दहशतवादी संघटनेशी संबंध

खलिस्तान कमांडो फोर्स (KCF) ची स्थापना ऑगस्ट १९८६ मध्ये मनबीर सिंग छेडू याच्या नेतृत्वाखाली पंथक समिती आणि दमदमी टकसाल यांच्या समर्थनाने झाली होती. सध्‍या ही दहशतवादी संघटना KCF-पंजवार म्हणून ओळखली जाते. मनबीर सिंग छेडू याला ऑगस्ट १९८६ मध्ये अटक झाली होती. यानंतर सुखदेव सिंग उर्फ ​​सुखा सिपाही याने संघटनेची सूत्रे आपल्‍या हाती घेतली. यानंतर दहशतवादी संघटनेची कमान पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या परमजीत सिंग पंजवाडकडे सोपवण्यात आली. पंजवाडने लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांशी संबंध जोडून आपली संघटना मजबूत केली होती.

बँकेतील कर्मचारी ते खलिस्‍तान संघटनेचा म्‍होरक्‍या…

परमजीत पंजवार हा खलिस्तान कमांडो फोर्समध्ये सामील होण्यापूर्वी एका बँकेत नोकरी करत होता. १९८६ मध्‍ये तो संघटनेत सहभागी झाला. त्‍याचा चुलत भाऊ लाभ सिंग याचा त्याच्यावर मोठा प्रभाव होता. १९९० च्या दशकात लाभ सिंग पोलीस चकमकीत ठार झाला. यानंतर पंजवार याने पाकिस्‍तानमध्‍ये पलायन केले होते. त्‍याच्‍यावर १९८९ तश १९९० या कालावधीत दहा गुन्‍हे दाखल झाले होते. यामध्‍ये सात खुनाचे आणि दोन टाडा अंतर्गत गुन्ह्यांचा समावेश होता.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news