Latest

Sadhvi Pragya : साध्वी प्रज्ञांना दाऊद गॅंगकडून ठार मारण्याची धमकी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर (Sadhvi Pragya) यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. एका व्यक्तीने त्यांना फोन करून सांगितले की, मी इक्बाल कासकरचा माणूस बोलतोय. तुमचा खून होणार आहे. या प्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी टीटी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी (Sadhvi Pragya) म्हटले आहे की, फोनवरून मला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. फोन करणार्‍याने स्वतःची ओळख दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा माणूस म्हणून दिली. तसेच तुमचा खून होणार आहे, असे त्यांने सांगितले. दरम्यान, या फोनवरील संभाषणाचा व्हिडिओही रेकॉर्ड झाला आहे, तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.

साध्वीने नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे केले होते समर्थन

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची पाठराखण केली होती. या प्रकरणात त्यांनी भारत हिंदूंचा असल्याचे म्हटले होते. पाखंड्यांनी नेहमीच असे केले आहे. चित्रपट बनवून हिंदूंच्या देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत सनातन येथे राहणार असून त्याला जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे, असे त्यांनी म्हटले होते.

हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT