Latest

D Roopa (IPS) vs Rohini Sindhuri (IAS) : प्रायव्हेट फोटो शेअर करण्यावरुन भांडणाऱ्या ‘त्या’ महिला सनदी अधिकांऱ्यांची बदली

अमृता चौगुले

बंगळुरु; पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील दोन महिला नोकरशहा IPS डी रूपा आणि IAS अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्यात प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यावरुन सुरू असलेल्या वादाची दखल कर्नाटक सरकारने घेतली आहे. या दोघींचा विकोपाला गेलेल्या वादाची दखल घेत आयीपीएस डी रुपा आणि आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांची बदली करण्यात ाअली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आदेशापर्यंत आयपीएस डी रूपा आणि आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, दोघांनाही अद्याप कुठेही पोस्टिंग मिळालेली नाही. त्याचवेळी आयपीएस रूपा यांचे पती आयएएस अधिकारी मुनीश मौदगील यांचीही बदली करण्यात आली आहे. (D Roopa (IPS) vs Rohini Sindhuri (IAS))

कालच्या रविवारी, जेव्हा डी रूपाने रोहिणी सिंधुरीचे काही वैयक्तिक फोटो (private photos) सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा लोक सुद्धा अवाक झाले. फोटो शेअर करताना रूपाने दावा केला की, सिंधुरीनेच तिचे वैयक्तिक फोटो तीन पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना पाठवले होते. रुपा यांनी सिंधुरी यांच्यावर १९ आरोप केले आहेत. दुसरीकडे, सिंधुरी यांनी गेल्या रविवारी एक निवेदन प्रसिद्ध करून रुपा आपली बदनामी करण्यासाठी खोटे आरोप करत असल्याचे म्हटले आहे. (D Roopa (IPS) vs Rohini Sindhuri (IAS))

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचला वाद (D Roopa (IPS) vs Rohini Sindhuri (IAS))

इतकंच नाही तर आयपीएस डी रूपा यांनी आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्या भांडणानाला घेऊन कर्नाटकचे राज्यसभा खासदार लहार सिंह सिरोया यांनी ट्विट केले आहे. त्याचवेळी कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनीही नाराजी व्यक्त करत सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण देत कारवाईचा इशारा दिला. ते म्हणाले, कर्नाटकातील नोकरशहांमध्ये जे काही चालले आहे ते दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले होते. मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी भारतभरातील नोकरशहांना त्यांची वैयक्तिक सोशल मीडिया खाती बंद करण्याचा सल्ला द्यावा. त्यांची वैयक्तिक मते आणि प्राधान्ये अनेकदा सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करतात.

एवढेच नाही तर कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र म्हणाले की, आम्ही गप्प बसलो नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल. दोघीही एवढे वाईट वागत आहेत, सर्वसामान्य लोकं असे रस्त्यावरही असं वागत नाहीत. हे खूप वाईट वर्तन आहे. त्यांच्या वैयक्तिक मुद्द्यांवर त्यांना वाट्टेल ते करू द्या, पण सोशल मीडियावर यांनी असे वागू नये. मुख्यमंत्र्यांनाही त्याची माहिती आहे.

कोण आहेत IAS रोहिणी सिंधुरी आणि IPS डी रूपा

रोहिणी सिंधुरी या २००९ च्या बॅचच्या कर्नाटक कॅडरच्या IAS अधिकारी आहेत. त्या मूळच्या आंध्र प्रदेशच्या आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक पदांवर काम केले आहे. यावेळी बदली होण्यापूर्वी त्या हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय विभागाच्या आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. याशिवाय डी रूपाविषयी सांगायचे तर त्या कर्नाटक हस्तशिल्प विकास महामंडळात एमडी म्हणून कार्यरत होत्या. ज्यांचीही तत्काळ बदली झाली आहे.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT