Putin Speech : ‘आम्हाला आव्हान दिलंय, आता मागे हटणार नाही’, पुतिन यांचा अमेरिकेला इशारा | पुढारी

Putin Speech : ‘आम्हाला आव्हान दिलंय, आता मागे हटणार नाही’, पुतिन यांचा अमेरिकेला इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : Putin Speech : आम्ही युद्ध हा शेवटचा पर्याय मानतो आणि संवादातून तोडगा काढण्यावर आमचा विश्वास आहे. शांततापूर्ण चर्चेतून मार्ग निघावा यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो, पण अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी काम बिघडवले, असे प्रतिपादन रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या युक्रेन भेटीच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी देशाला संबोधित केले. रशियन संसद क्रेमलिनमध्ये ते बोलत होते.

अमेरिकेने इराक आणि सीरियामध्ये जसा खेळ मांडला त्याचपद्धतीने त्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी युक्रेनचा वापर करून घेतला आहे. रशियाच्या बाजूने संवादाचे प्रयत्न झाले, ज्याकडे पाश्चिमात्य देशांनी दुर्लक्ष केले. युद्ध हा आमच्यासाठी शेवटचा पर्याय होता. अमेरिकेमुळे आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला आहे. आम्हाला आव्हान दिले गेले असून, आता मागे हटणार नसल्याचा इशारा पुतिन (Putin Speech) यांनी यावेळी दिला.

नाटो देशांच्या हस्तक्षेपावर आक्षेप घेत पुतिन (Putin Speech) म्हणाले, ‘रशियन जनतेची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची असून त्याच्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही. रशियामध्ये नाटोचा हस्तक्षेप सातत्याने वाढत आहे. पाश्चात्य देश आपली शक्ती वाढवण्यासाठी युक्रेन युद्धाला खतपाणी घालत आहेत असून युक्रेननेही त्याला प्रोत्साहन देत आहे. जर ते समोरासमोर वाटाघाटीसाठी आले असते तर इतके नुकसान झाले नसते. रशिया स्वतःचा बचाव करण्यास सक्षम आहे. आम्ही मागे हटणार नाही. आम्हाला रक्तपात नको आहे, पण पाश्चात्य देश या युद्धाचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करत आहेत,’ असा त्यांनी आरोप केला.

‘शांततेबाबत युक्रेन गंभीर नाही. चर्चेने प्रश्न सुटले असते, पण त्यांनी आडमुठी भूमिका घेऊन स्वत:च्या नागरिकांवर युद्ध लादले. या युद्धाचे निमित्त करून अमेरिका आपली शस्त्रे विकण्याचा प्रयत्न करत आहे. पाश्चात्य देश रशियाच्या संस्कृतीवर आक्रमण करत असून दररोज नवनवीन आव्हाने देत आहेत. अशा परिस्थितीत आपण मागे हटणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button