मुंबई : पुढारी वृत्तसेवा सायबर ठगाने ईमेलच्या माध्यमातून एका कंपनीच्या संचालकाला गंडा घालून ४४ लाख लंपास केले खरे, पण हा फसवणूकीचा प्रकार वेळीच संचालकाच्या लक्षात आला आणि त्याने मुंबई पोलिसांच्या सायबर हेल्पलाईनला कॉल केला. सायबर पोलिसांनीही जलद गतीने कारवाई करत, गोल्डन अवरमध्ये ४४ लाख रुपये परत मिळवले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी यातील तक्रारदार यांनी १९३० सायबर हेल्पलाईन येथे कॉल केला. ते संचालक असलेल्या टेक्सटाईल कंपनी आणि त्यांची व्यावसायिक भागीदार कंपनी यांच्यामधील व्यावसायिक ईमेल संभाषणा दरम्यान अज्ञात व्यक्तीने चुकीच्या बँक खात्यावर इंटरनेट बँकिंगद्वारे ४४ लाख ४३ हजार २७९ रुपये पाठवण्यास भाग पाडले असल्याची तक्रार दिली.
त्यानुसार, सायबर हेल्पलाईन कक्षातील पोउनि मंगेश भोर, मपोशि बुरुमकर आणि बाबरे यांनी तात्काळ एनसीआरपी पोर्टलवर तक्रार दाखल करून सबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधत, सायबर फसवणूकीची संपूर्ण रक्कम कॅनरा बँक खात्यावर होल्ड केली आहे.
हेही वाचा :