Latest

Crew-4 : अंतराळात मातीशिवाय वनस्‍पती वाढणार? ‘नासा’च्‍या क्रू- 4 मिशनला प्रारंभ

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क:

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्‍थेच्‍या ( नासा ) स्‍पेसएक्‍स क्रू – 4 मिशना प्रारंभ झाला. चार अंतराळवीरांना घेवून आज ( दि. २७ ) पहाटे ३ वाजून ५२ मिनिटांनी ( भारतीय प्रमाणवेळ दुपारी १ वाजून २२ मिनिटे ) स्‍पेसएक्‍स क्रू – 4 अंतराळात झेपावले. केजेल लिंडग्रेन, रॉबर्ट हाइंस, जेसिक वॉटकिन्‍स आणि सामंथा क्रिस्‍टोफॅरेटी हे अंतराळवीर सुमारे साडेचार महिने अंतराळात राहतील. या काळात ते विविध विषयांवर संशोधन करतील. तसेच स्‍पेसएक्‍स क्रू – ३ मिशनचे मातीशिवाय वनस्‍पती वाढविण्‍याचा प्रयोगाचे संशोधन स्‍पेसएक्‍स क्रू – ४
( Crew-4 )  पुढे सुरु ठेवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Crew-4 : अंतराळवीर कोणते संशोधन करणार?

मातीशिवाय वनस्‍पती वाढविण्‍यासाठी हायड्रोपोनिक (वनस्‍पतींना आवश्‍यक असणारी पोषकतत्त्‍वे पाण्‍याच्‍या साहाय्‍याने देणे ) आणि एरोपोनिक ( पाणी आणि हवेवर वनस्‍पतीची वाढ करणे) तंत्रांवर हे अंतराळवीर अधिक प्रयोग करतील. मातीशिवाय वाढणार्‍या वनस्‍पतीच्‍या संशोधनात आता सुरु झाले आहे. सध्‍या अंतराळात मातीविना होणार्‍या वनस्‍पती वाढीसाठी हायड्रोपोनिकव एरोपोनिक तंत्रचा वापर खूपच कमी आहे. भविष्‍यात अंतराळ संशोधात यावा वापर मोठ्या प्रमाणावर होईल, असे 'नासा'ने आपल्‍या निवेदनात म्‍हटलं आहे.

स्‍पेसएक्‍स क्रू – 4 मधील संशोधन हे कृत्रिम मानवी रेटिना विकसित करण्‍याचाही प्रयोग करतील. हा प्रयोग यशस्‍वी झाल्‍यास पृथ्‍वीवरील लाखो दृष्‍टीहिन नागरिकांना याचा फायदा होईल. किबोर रोबोट प्रोग्रामिंग चँलेज व अंतराळवीरांचे आरोग्‍य यावरही अभ्‍यास करणार असल्‍याचे 'नासा'ने म्‍हटले आहे.

हेही वाचा :

पाहा व्‍हिडीओ :

SCROLL FOR NEXT