Latest

Covaxin- Covishield लशीचे कॉकटेल प्रभावकारक ! आयसीएमआरचा दावा

backup backup

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या लशींचा पहिला आणि दुसरा डोस देता येवू शकतो का? या अनुषंगाने जगभरात विविध चाचण्या केल्या जात आहेत (Covaxin- Covishield) . दरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) अभ्यासाच्या आधारे एक महत्वपूर्ण दावा करण्यात आला आहे. कोव्हॅक्सिन तसेच कोव्हिशीड (Covaxin- Covishield) या कोरोना लशीचा एकत्रित डोस कॉकटेल देवून करण्यात आलेल्या अभ्यासात सकारात्मक निष्कर्ष समोर आले आहे.

एडिनोव्हायरस वेक्टर प्लॅटफॉर्म-बेस्ड व्हॅक्सिनच्या एकत्रितकरणाने लस सुरक्षित तसेच रोगप्रतिरोधक क्षमतावर्धक​ आढळल्याचे निष्कर्ष आयसीएमआरने वर्तवले आहे.

गेल्या महिन्यात भारताच्या औषध महानियंत्रकांच्या (डीसीजीआय) एक विशेषतज्ञांच्या समितीने कोव्हिशील्ड- कोव्हॅक्सिन कोरोना लशींच्या एकत्रित डोस वर अभ्यास करण्याची शिफारस केली होती. \

वेल्लोर येथील ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालयाकडून (सीएमसी) यासंबंधी परवानगी मागण्यात आल्यानंतर ही शिफारस करण्यात आली होती.

लशींचा कोर्स पूर्ण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लशींचा डोस दिला जावू शकतो का? जर कुणाला कोव्हिशील्डचा एक डोस आणि कोव्हॅक्सिनचा एक डोस दिला तर तो प्रभावकारक ठरेल का? याचा शोध घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता, अशी माहिती सेंट्रल ड्रस्ग स्टॅंन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशनच्या (सीडीएससीओ) विषयतज्ञ समितीकडून देण्यात आली आहे.

कोरोनावर कोव्हिशील्ड तसेच कोव्हॅक्सिनचे एकत्रित डोस देखील बरेच फायदेकारक असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे.

यासंबंधीच्या चाचणीत ३०० स्वयंसेवक सहभागी झाले होते.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर मध्ये २० लोकांना आरोग्य कर्मचार्यांच्या निष्काळजीपणामुळे दोन वेगवेगळ्या लशींचा डोस लावण्यात आला होता.

पंरतु, वेगवेगळे डोस घेण्यामुळे यापैकी कुठल्याही नागरिकांमध्ये आरोग्य संबंधी समस्या उद्भवली नव्हती, हे विशेष.

SCROLL FOR NEXT