Latest

मुंबई ते बेलापूर प्रवास अवघ्‍या ३० मिनिटांत; वॉटर टॅक्सी सेवा सुरु

अमृता चौगुले

बेलापूर, पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  मुंबई ते बेलापूर या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ आज झाला आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांची योजना असलेल्या वॉटर टॅक्सीचे आज उद्घाटन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल हे या सोहळ्याला ऑनलाईन उपस्थित होते. तसेच राज्‍याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, भाजप आमदार मंदा म्हात्रे, खासदार राजन विचारे या उद्‌घाटन सोहळयाला उपस्थित होते.

बेलापूर मधून 10 ते 30 इतकी प्रवासी क्षमता असलेली 7 स्पीडबोट तसेच 56 प्रवासी क्षमता असलेली कॅटामरान बोट सेवा देणार आहे. एकूण 8 अशा बोटी आहेत. आज पासून प्रवाशांसाठी ही वॉटर टॅक्सी सेवा सुरु केली आहे. या बोटीतून बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का या ठिकाणी जाण्यास फक्त 30 मिनिटे लागतात. आणि कॅटामरान या बोटीने प्रवास करण्यास 40 ते 50 मिनिटे लागतील.

प्रवासाचे तिकिट

स्‍पीड बोटीचे तिकिट हे प्रति प्रवासी 800 ते 1200 रूपये असून कॅटामरान बोटीचे तिकिट प्रति प्रवासी रुपये 290 रूपये आहे. या बोटी बेलापूर मधून प्रवास सुरू करून भाऊच्या धक्क्या बरोबर एलिफंटा, जेएनपीटी या मार्गावर जातील.

हे ही वाचलं का  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT