Latest

भाजपसाठी पॉझिटिव्ह बातमी! देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे ते आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा सक्रिय होणार आहेत. फडणवीस यांनी ५ जून रोजी ट्विट करत आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच राहून उपचार घेत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

फडणवीस लातूरवरुन सोलापूर दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांना ताप आल्याने त्यांनी हा दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले होते. फडणवीस यांना आतापर्यंत दोनवेळा कोरोनाची लागण झाली आहे. आता त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

राज्यात सध्या विधान परिषद, राज्यसभा निवडणुकीच्या हालचाली सुरु आहेत. याच दरम्यान फडणवीसांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने भाजपसाठी ही पॉझिटिव्ह बातमी आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT