Latest

वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : इंदुरीकर खटल्याची सुनावणी 21 रोजी

अमृता चौगुले

संगमनेर: पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्रातील थोर समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर हे काल बुधवारी संगमनेरच्य न्यायालयात झालेल्या सुनावणीला उपस्थित राहिले नाही. मात्र इंदुरीकर महाराजांच्या वकिलाने न्यालयात अर्ज दाखल केला. त्यामुळे न्यालयाने पुढील सुनावणी 21 नोव्हेंबर 2023 रोजी ठेवली आहे. इंदुरीकर महाराज यांनी सन 2020 ला अपत्यप्राप्तीबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य केले होते, म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाल याने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या निर्ण याला आव्हान देत उच्च न्याल्यात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने हा खटला पुन्हा संगमनेरच्या न्यायालयात चालविण्याचे आदेश दिले होते.

संबंधित बातम्या :

इंदुरीकर महाराज सर्वोच्च न्यायालयात गेले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत हा खटला पुन्हा संगमनेर न्यायालयात हा खटला नव्याने सुरू झाला आहे. मागील महिन्यात न्यायालयाने इंदुरीकर महाराज यांना समन्स बजावले होते. समन्स न मिळाल्यामुळे 13 ऑक्टोबरच्या सुनावणीसाठी गैरहजर होते. समन्स घेऊन गेलो असता इंदुरीकर महाराज भेटले नाही, असा रिपोर्ट पोलिसांकडून कोर्टात सादर केला होता.इंदुरीकर महाराज यांना न्यायालयाने बजावलेले समन्स मंगळवारी मिळाले होते. मात्र ते बाहेर गावी असल्यामुळे ते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाही, असा अर्ज त्यांचे वकीलांनी दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT