Latest

तेलंगणात काँग्रेसला धक्‍का, पलवाई स्रावंती यांचा ‘बीआरसी’मध्‍ये प्रवेश

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क ; तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्‍का बसला आहे. पक्षाच्‍या नेत्‍या पलवाई स्रावंती
(Palvai Sravanthi) यांनी आज ( दि.12) चंद्रशेखर राव यांच्‍या भारत राष्ट्र समिती ( बीआरसी) पक्षात प्रवेश केला.

कोण आहेत पलवाई स्रावंती ?

पलवाई स्रावंती या काँग्रेसचे दिवंगत नेते पलवाई गोवर्धन रेड्डी यांची कन्या आहेत. नोव्हेंबरमध्ये मुनुगोडे मतदारसंघातून पक्षाने त्‍यांना तिकीट नाकारले होते. तेव्‍हापासून त्‍या नाराज होत्‍या. या मतदारसंघात भाजपमधून पक्षात परतलेल्या कोमातीरेड्डी राजगोपाल रेड्डी यांना काँग्रेसने तिकीट दिले होते. ( Palvai Sravanthi joins BRS party )

स्रावंती यांनी शनिवारी सोमाजीगुडा येथे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचा राजीनामा दिला होता. काँग्रेसच्‍या माजी अध्‍यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना उद्देशून चारपानी राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, त्यांचे मौन आणि निष्क्रियतेमुळे तेलंगणात पक्षाचे काहीही भले होत नाही. रेवंत रेड्डी यांच्याविरोधात टीका करणाऱ्या राजगोपाल रेड्डी यांना रातोरात परत कसे स्वीकारले गेले आणि त्यांना तिकीट दिले गेले हे अत्यंत खेदजनक आहे, असेही त्‍यांनी आपल्‍या पत्रात म्‍हटले होते. ( Palvai Sravanthi joins BRS party )

माझे वडील पालवाई गोवर्धन रेड्डी हे निस्वार्थी राजकारणी होते. त्‍यांनी त्‍याचे जीवन पूर्ण क्षमतेने पक्षाला अर्पण केले. दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या माध्यमातून ते गांधी कुटुंबाचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत होते. मात्र पक्षात आता जुन्या काळातील आणि पक्षासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्यांना आता स्थान किंवा आदर नाही, असेही त्‍यांनी आपल्‍या पत्रात म्‍हटले होते. ( Palvai Sravanthi joins BRS party )

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT