Latest

राहुल गांधींनी खाल्‍ले गोलगप्पे; चटपट्या चाटचा घेतला आस्‍वाद, जुन्या दिल्‍लीत घेतले ‘प्रेमाचे सरबत’

निलेश पोतदार

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन  : काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच सर्वसामान्य लोकांच्यात मिसळून स्‍थानिक खाद्यपदार्थांचा आस्‍वाद घेत असतात. राहुल गांधी यांनी काल (मंगळवार) दिल्‍लीतल्‍या स्‍ट्रीट फूडचा आस्‍वाद घेतला. राहुल यांनी बंगाली मार्केट मध्ये गोलगप्पे खाल्‍ले. यानंतर ते जुन्या दिल्‍लीत गेले. या ठिकाणी त्‍यांनी चटपट्या चाटचा आस्‍वाद घेतला. यावेळी राहुल गांधी यांनी निळ्या रंगाचा टीशर्ट परिधान केला होता.

राहुल गांधी मार्केटमध्ये आल्‍याचे पाहून यावेळी मोठ्या संख्येने लोक त्‍यांच्या भोवती जमा झाले. लोक त्‍यांच्यासोबत सेल्‍फी घेण्यासाठी धडपडू लागले. बंगाली मार्केटमधून राहुल गांधी जुन्या दिल्‍लीतील जामा मस्‍जिद परिसरात पोहोचले. या परिसरातील चटपट्या चाटचा त्‍यांनी मनसोक्‍त आस्‍वाद घेतला.

जामा मस्‍जिद परिसरात राहुल गांधी यांनी मोहब्‍बत का शरबत बरवणाऱ्या दुकानाला भेट दिली. याशिवाय त्‍यांनी जवाहर हॉटेल मध्ये लोकांसोबत बसून जेवण केले.

या आधीही राहुल गांधी यांना दिल्‍लीतल्‍या वेगवेगळ्या ठिकाणी रेस्‍टाँरन्ट मध्ये पाहिले गेले आहे. देशात २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्‍या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे आतापासूनच सक्रिय झाल्‍याचे दिसून येत आहे.

राहुल गांधी यांची नुकतीच खासदारकी रद्द करण्यात आली. त्‍यामुळे त्‍यांना आपला सरकारी बंगलाही सोडावा लागला. सध्या ते सोनिया गांधी यांच्या बंगल्‍यात शिफ्ट झाले आहेत.

राहुल गांधी यांना दिल्‍लीतले छोले भठूरे आणि गोलगप्पे खूप आवडतात. ते अनेक ठिकाणी स्‍ट्रीट फूडवरही ताव मारतात. तेंव्हा त्‍यांना पाहण्यासाठी त्‍यांच्यासोबत सेल्‍फी घेण्यासाठी लोकांची त्‍यांच्याभोवती गर्दी होते.


हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT