Latest

PM Modi : नक्षलवादावरील नियंत्रणास काँग्रेस अपयशी: पंतप्रधान मोदी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : "छत्तीसगडमधील नक्षलवादावर नियंत्रण मिळवण्यास काँग्रेस सरकार अपयशी ठरले" अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे. आज (दि.७) छत्तीसगडमधील सूरजपूर येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, "काँग्रेसने तुम्हा सर्वांना विश्वासघाताशिवाय काहीही दिले नाही. काँग्रेसने छत्तीसगडच्या तरुणांची स्वप्नेही पूर्ण केली नाहीत. त्यांनी महादेवाच्या नावाने घोटाळाही केला. 'महादेव' सट्टेबाजी घोटाळ्याची आज देश-विदेशात चर्चा होत आहे. काँग्रेसने आपली तिजोरी भरण्यासाठी तुमच्या मुलांवर सट्टा लावला आहे. तुम्ही त्यांना माफ करणार का?" असा सवालही त्यांनी यावेळी केला.

छत्तीसगडमध्ये मतदान केंद्राजवळ गोळीबार

आज सकाळी बांदा मतदान केंद्रापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर तैनात असलेल्या डीआरजी जवानांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. नक्षलवाद्यांकडून होणारा गोळीबार १० मिनिटांनी थांबला. सर्व जवान सुरक्षित असून मतदान सुरू आहे, असे सुकमा पोलीसांनी सांगितले.

मतदानावेळी नक्षल्यांचा दहशतीचा प्रयत्न; सुकमामध्ये स्फोट

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात मंगळवारी मतदान सुरू होताच नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) स्फोटात निवडणूक कर्तव्यावर असलेला एक सीआरपीएफ जवान जखमी झाला. सुकमाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी किरण चव्हाण यांनी ही माहिती दिली. हा जवान कोब्रा बटालियनचा असून तो निवडणूक ड्युटीवर तैनात होता. श्रीकांत असे या जवानाचे नाव आहे.

कोब्रा २०६ आणि सीआरपीएफचे जवान कॅम्प टोंडामार्का येथून एलमागुंडा गावाकडे जात असताना ही घटना घडली. गस्तीदरम्यान जवानाचा नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीवर पाय पडला. यामध्ये त्याच्या पायाला दुखापत झाली. छत्तीसगडमध्ये दोन दिवसांत आयईडी स्फोटाची ही दुसरी घटना आहे. सोमवारी, कांकेरमध्ये बीएसएफचे कॉन्स्टेबल आणि दोन पोलिंग टीम सदस्य प्रेशर आयईडी स्फोटात जखमी झाले. प्रकाश चंद असे जखमी हवालदाराचे नाव असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. दरम्यान, आयईडी स्फोटात दोन्ही मतदान अधिकारी किरकोळ जखमी झाले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT