Kupwara Shivaji Maharaj statue : सीमेवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जवानांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

Kupwara Shivaji Maharaj statue : सीमेवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जवानांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क: सीमेवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जवानांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लाेकार्पण आज (दि.७) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगीत ते बाेलत हाेते. याप्रसंगी जम्‍मू-काश्‍मीरचे नायब राज्‍यपाल मनाेज सिन्‍हा, महाराष्‍ट्राचे सांस्‍कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. (Kupwara Shivaji Maharaj statue)

या वेळी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अनेक वीर जवान आपल्या सीमांचे संरक्षण करत आहेत. त्यामुळे आपण उत्साहाने अनेक सण-उत्सव साजरे करतो. भारतीय जवानांनी देशासाठी दिलेले वीरमरण विसरणे अशक्य आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली. (Kupwara Shivaji Maharaj statue)

भारत-पाकिस्तान सीमेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे सीमेवरील जवानांना प्रेरणा मिळेलच. हा पुतळा पाकिस्तानकडे तोंड करून आहे. त्यामुळे पाकिस्तानातील शत्रुलाही शिवाजी महाराजाच्या हातातील तलवार जरब बसवणारी ठरेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्‍पष्‍ट केले. (Kupwara Shivaji Maharaj statue)

हेही वाचा:

Back to top button