Latest

Condom King : कंडोम किंग म्हणून फेमस आहे ‘ही’ व्यक्ती

रणजित गायकवाड

नैरोबी; पुढारी ऑनलाईन : Condom King : जगातील प्रत्येक देश वाढती लोकसंख्या आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी आवश्यक ती पावले उचलत असतो. लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकार अनेक प्रकारच्या जनजागृती मोहिमाही राबवते, मात्र असे असतानाही लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव आहे. आजही असे अनेक देश आहेत जिथे लोकांना कंडोमबद्दल माहितीही नाही. नॅशनल हेल्थ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार, 2011 ते 2015 पर्यंत 15 ते 44 वयोगटातील केवळ 33.7 टक्के पुरुषांनी कंडोम वापरला. कंडोमबद्दल माहिती मिळविण्यासाठी अनेक लोक संकोच बाळगतात. ही एक मोठी समस्या आहे.

पण आफ्रिका खंडातील एक महत्त्वपूर्ण असलेल्या केनिया या देशातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तिथे एक व्यक्ती कंडोमबद्दल लोकांच्या जनजागृती करण्यासाठी मोफत कंडोमचे फिरतो. कंडोम बाबत लोकांमध्ये असणारा संकोच आणि लाज दूर करण्यासाठी तो कार्यमग्न आहे. स्टेनली नगारा असे या व्यक्तीचे नाव असून तो केनियामध्ये कंडोम किंग म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या कामाचा गौरव म्हणून मला कंडोम किंग म्हणून संबोधण्यात येते असे तो आनंदाने सांगतो. लोकसंख्या नियंत्रण तसेच एड्सबाबत जगजागृती करणे माझे कर्त्यव्य असल्याने मी नैरोबीच्या रस्त्यावर प्रत्येक व्यक्तीला कंडोम देत फिरतो, असे तो अभिमाने सांगतो.

आफ्रिकेतील लोकांमध्ये जागृती करण्यासाठी स्टॅनली गारा यांनी कंडोम वाटण्याची जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतली आहे. आफ्रिकेत दरवर्षी लाखो लोकांना एड्स होतो आणि त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू होतो. स्टॅनली गारा यांच्या मित्राचाही एड्समुळे मृत्यू झाला होता. मित्राच्या मृत्यूनंतर मी सुन्न झालो होतो, तो मला एक धक्का होता. त्याच्या जाण्यानंतर मी लोकांमध्ये कंडोमविषयी जनजागृती करण्याचे ध्येय ठेवले. जे मी माझ्या शेवटापर्यंत करत राहिन, असंही भावनिक मनोगत स्टॅनली गारा व्यक्त करतात.

'सेक्स ही लाजिरवाणी गोष्ट नाही'

स्टेनली गारा राजाप्रमाणे कपडे परिधान करून रस्त्यावर फिरतात आणि लोकांना कंडोमचे वाटप करतात. याशिवाय ते लोकांना एचआयव्ही एड्स आणि लोकसंख्या नियंत्रण, तसेच गर्भपाताच्या अडचणींबाबत जनजागृती करतात. कंडोम वापरणे ही लाजिरवाणी बाब नसून त्याबद्दल खुलेपणाने बोलले पाहिजे, असे स्टेनली खुलेपणाने सांगतात. स्टेनली पुढे म्हणतात की, मानवी जीवनात लैंगिक जीवनाला फार महत्त्व दिलं जातं. तसं तर अजूनही अनेक देशात शारीरिक संबंध किंवा लैंगिक जीवनाकडे लाजिरवाणी गोष्ट म्हणून पाहिलं जातं. यावर फार मोकळेपणाने बोलले जात नाही. पण तरी सुद्धा यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, लैंगिक जीवन हे केवळ आनंदी असून चालत नाही तर हेल्दी सुद्धा ठेवण्याचा प्रयत्न करा. लैंगिक जीवनाबाबत अनेक गैरसमज असल्या कारणाने अनेकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.