नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: चुकीचे केस कापणे पडले महागात : चुकीच्या पद्धतीने केस कापणे आणि चुकीची हेअर ट्रीटमेंट देणे दिल्लीतील एका सलूनला चांगलेच महागात पडले आहे. एका मॉडेलचे केस मनासारखे केस कापले नाहीत म्हणन तब्बल २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई त्याला द्यावी लागणार आहे.
राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सलूनमालकाला तसे आदेश दिले आहेत.
नुकसानभरपाईचे दोन कोटी रुपये आठ हप्त्यांमध्ये देण्याचे आदेश दिले आहेत.
हा आदेश देताना आयोग म्हणाले, महिला आपल्या केसांची खूपच निगा राखतात.
त्यासाठी भरपूर पैसेही खर्च करतात. महिला केसांशी भावनात्मकरित्या जोडलेल्या असतात.
हे सलून दिल्लीतील एका नामांकित हॉटेलमध्ये असून चुकीच्या पद्धतीने केस कापून त्याला चुकीची ट्रीटमेंट दिली.
ही मॉडेल हेअर प्रॉडक्टच्या जाहिरातील करते. त्यासाठी तिचे केस हेच भांडवल होते.
सलूनच्या चुकीमुळे तिला सगळ्या जाहिराती गमवाव्या लागल्या.
याप्रकरणी तिने आयोगाकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी करताना अध्यक्ष आर. के. अग्रवाल आणि सदस्य डॉ. एस. एम. कांतिकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
तक्रारकर्त्या आशना रॉय यांच्या सुंदर आणि लांब केसांमुळे त्या हेअर प्रॉडक्टच्या मॉडेल होत्या. त्यांनी अनेक मोठ्या ब्रॅडच्या हेअर केअर ब्रँडसाठी मॉडेलिंग केले आहे.
त्या एका हॉटेलमधील सलूनमध्ये गेल्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे केस कापले नाहीत. त्यामुळे चुकीच्या केशकर्तनामुळे त्यांना कामे मिळेनाशी झाली.
परिणामी त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांचे राहणीमानही बदलले. टॉप मॉडेल बनण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले.
सलूनने चुकीच्या पद्धतीने केस कापल्याने ती प्रचंड तणावाखाली होती. त्यामुळे ती आपल्या कामात लक्ष देऊ शकत नव्हती.
परिणामी तिला आपली नोकरीही गमवावी लागली.
हॉटेलमधील सलूनच्या हेअर ट्रीटमेंट बेपर्वाईमुळे तिला हे सगळे झेलावे लागले.
चुकीच्या हेअर ट्रीटमेंटमुळे तिची त्वचा जळाली तसेच तिला ॲलर्जीचा सामना करावा लागला.
या ट्रीटमेंटमुळे कायमची खरूज उठू लागली. याप्रकरणी तक्रारकर्त्या महिलने हॉटेलशी केलेला व्हॉट्स ॲप संवाद ग्राह्य मानला गेला.
यात हॉटेलने आपली चूक मान्य केली आहे. तसेच त्यांना फ्री हेअर ट्रीटमेंट देण्याची ऑफरही दिली.
त्यामुळे तक्रारकर्त्या महिलेची तक्रार योग्य आहे. परिणामी तिला २ कोटी रुपये दिल्यास तिला योग्य न्याय मिळेल. ही रक्क आठ हप्त्यांत द्यावयाची आहे. (चुकीचे केस कापणे पडले महागात )
आशना या २०१८ मध्ये आपल्या इंटरव्ह्यूच्या आधी एक आठवडा दिल्लीतील संबधित हॉटेलमधील हेअर सलूनमध्ये गेल्या होत्या.
त्यांनी तेथील कर्मचाऱ्याला पुढे लांब फ्लिक्स ठेव आणि मागील बाजुने चार इंच केस कापण्यास सांगितले.
मात्र, त्या कर्मचाऱ्याने तिचे ऐकून न घेता केवळ चार इंच केस ठेवून तिचे लांबसकड केस कापले. त्यावेळी वाद झाल्यानंतर हॉटेलने त्यांना फ्री ट्रीटमेंट देण्याची ऑफर दिली.
मात्र, संबधित मॉडेलचे करिअर केसांवर असल्याने तिने ३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती. एकूणच केस कापणे सलूनला पडले महागात.
हेही वाचा :