बोरपाडळे; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर बोरपाडळे (ता. पन्हाळा) घाटात कारने पेट घेतल्याने वाहनचालकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. अभिजित पांडुरंग ठाणेकर (वय 35, ता. आजरा) असे मृत्यू झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पान 4 वर
कोल्हापूरहून मलकापूरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकी वाहनाला अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीतून स्वत:ची सुटका करून घेण्याचा चालकाचा प्रयत्न अयशस्वी झाला. या आगीत चारचाकीसह चालक जळून खाक झाला. ही आग स्थानिकांसह कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन विभागाने आटोक्यात आणली. रात्री उशिरा घटनास्थळाची पाहणी करून कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशीद, सहायक पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला. ठाणेकर हा सध्या आसुर्ले-पोर्ले परिसरात राहण्यास होता.
डंपर-दुचाकी धडकेत मांजरेतील दोघे ठार
मलकापूर : पुढारी वृत्तसेवा
मोटारसायकल-डंपरच्या धडकेत मोटारसायकलवरील दोन तरुण ठार झाले. बाळासाहेब लहू भातडे (वय 20) व त्याचा मित्र सचिन बाळकृष्ण शेलार (23, दोघेही रा. मांजरे, ता. शाहूवाडी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास करंजफेण-मांजरे मार्गावर मोसमपैकी सोष्टेवाडी येथे हा अपघात झाला. शाहूवाडी पोलिसांत याची नोंद झाली आहे. बाळासाहेब भातडे व सचिन शेलार मोटारसायकलवरून (एम. एच. 09 जी 3624) पान 4 वर
करंजफेण येथून मांजरे गावी परत येत होते. मंदिरासमोर रस्त्यावर उभ्या असणार्या डंपरला (एम.एच. 10 सीआर 9772) मोटारसायकलची धडक बसली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.