पणजी; पुढारी वृत्तसेवा : अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) शुक्रवारी दाबोळी विमानतळावर कस्टम खात्याच्या सहकार्याने केलेल्या कारवाईत एक किलो कोकेनसह एका केनियन नागरिकाला अटक केली. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत ५ कोटी इतकी आहे. राज्यात मागील काही दिवसांत करण्यात आलेल्या एकूण कारवाईत ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
केनियन नागरिक असलेला सॅम्युएल हा त्याची ट्रॉली बॅग घेऊन विमानतळावर पुढे जात असताना त्याला अडवण्यात आले. अधिकार्यांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या बॅगेच्या तळात १.००९ किलो कोकेन लपवल्याचे आढळले. त्याला मुद्देमालासह त्वरित अटक करण्यात आली. सॅम्युअल हा जोहान्सबर्गमधून दिल्लीला आला होता व तेथून गोव्यात दाखल झाला होता.
दरम्यान, एनसीबीच्या दिल्ली शाखेने सॅम्युयल याच्याकडून माहिती घेऊन या व्यवहारातील प्रमुख संशयित नायजेरियन नागरिक असलेल्या जेम्स ई सी या व्यक्तीला दिल्लीत अटक केली.
हल्लीच गोवा पोलिसांच्या विविध विभागांनी एकवेळी २५ लाख, दुसर्या वेळी २१ लाखाचे ड्रग्ज जप्त केले होते व दोन्ही प्रकरणात विदेशी नागरिकांनाच अटक केली होती. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
अधिक वाचा :