Latest

Coal stock : कोल इंडियाकडे ४०० लाख टन कोळसा साठा, कोळसा मंत्रालयाचे स्पष्टीकरण

रणजित गायकवाड

देशातील ऊर्जा निर्मिती केंद्रांची गरज भागवू शकेल,एवढा पुरेसा कोळसा साठा ( Coal stock ) उपलब्ध असल्याचे स्पष्टीकरण रविवारी केंद्रीय कोळसा मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. सध्या ऊर्जा प्रकल्पांकडे ७२ लाख टन इतका कोळसा साठा असून आणखी चार दिवसांसाठी तो पुरेसा आहे. कोल इंडिया लिमिटेडकडे आणखी ४०० लाख टन साठा असुन त्याचा पुरवठा उर्जा केंद्रांना केला जात आहे. यावर्षी सप्टेंबरपर्यंत देशांतर्गत, कोळशापासून ऊर्जानिर्मितीत २४% ची वाढ झाली आहे. कोळसा कंपन्यांकडून होणाऱ्या कोळसा पुरवठ्यामुळेच ही वाढ शक्य झाली आहे.

( Coal stock ) सध्या देशातल्या सर्व औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना दररोज, १८.५ लाख टन कोळसा लागतो. पंरतु,यंदा पाऊस लांबल्याने कोळसा पुरवठ्यात अडचणी आल्या. प्रकल्पांमध्ये लागणाऱ्या कोळशाचा पुरवठा रोजच केला जातो. त्यामुळेच, कोळशाच्या उपल्ब्धतेबाबत कुठलीही भीती बाळगली जाऊ नये, असे कोळसा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशभरात यंदा प्रचंड पाउस पडत असूनही, कोल इंडिया लिमिटेड ने उर्जा कंपन्यांना २५५ मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा केला, असा दावा मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

सीआयएलने यंदा सर्वाधिक एच-१ पुरवठा केला. सीआयएल कडून वीजनिर्मिती कंपन्यांना दररोज १४ लाख टन कोळशाचा पुरवठा केला जातो. पाऊस कमी झाल्यानंतर लगेचच हा पुरवठा दररोज १५ लाख करण्यात आला असून लवकरच त्यात आणखी भर घातली जाणार आहे. देशांतर्गत कोळसा साठ्यामुळे देशात मुसळधार पाऊस, कोळशाच्या आयातीत घट, आणि कोळशाच्या च्या मागाणीत अचानक वाढ अशा अडचणी असतांनाही, ऊर्जानिर्मितीला पाठबळ मिळाले आहे. चालू आर्थिक वर्षात, कोळसा पुरवठ्यात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात, कोळशाच्या किमती वाढल्याने, आयात होणाऱ्या कोळशात सुमारे ३० % पर्यंत घट झाली आहे, पंरतु, देशांतर्गत कोळसा उत्पादन २४ टक्क्यांनी वाढले आहे. देशात कोळशाची स्थिती समाधानकारक असून कोल इंडिया तर्फे दररोज, २.५  लाख टन कोळसा,  बिगर वीजनिर्मितीही कंपन्यांना पाठवला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT