Latest

CM Basavaraj Bommai : चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना अश्रू अनावर

अमृता चौगुले

बंगळुरु; पुढारी ऑनलाईन : सध्या एक कन्नड चित्रपट  चांगलाच चर्चेत आला आहे. त्या चित्रपटाचे नाव '७७७ चार्ली' असे आहे. या चित्रपटाचे कर्नाटकसह देशात इतर ठिकाणी सुद्धा कौतुक होत आहे. १० जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटास सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai ) चांगलेच भावूक झाल्याचे दिसून आले. शिवाय हा चित्रपट पाहून त्यांना अश्रू अनावर झाले.

'७७७ चार्ली' (777 Charlie) हा चित्रपट एक व्यक्ती आणि त्याचा पाळीव कुत्र्याच्या संबधावर आधारित आहे. कुत्रा आणि त्याचा मालक यांच्यातील भावनिक संबंधातचे पदर यातून उलगडण्यात आले आहेत. हा चित्रपट पाहताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना त्यांच्या स्नूबी (Snooby) या कुत्र्याची आठवण झाली. त्‍याचे मागील वर्षी निधन झाले होते.

यावेळी भावनिक होत बोम्मई (CM Basavaraj Bommai ) म्हणाले, 'हा चित्रपट एका कुत्र्यावर आधारलेला आहे. पण, या चित्रपटात प्राण्यांचे भावविश्व दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटातील कुत्रा आपल्या भावना त्यांच्या डोळ्यांमाध्यमातून व्यक्त करतो. हा अत्यंत चांगला चित्रपट आहे आणि तो सर्वांनी पाहिला पाहिजे. नि:स्वार्थी प्रेमाची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे आणि कोणताही कुत्रा आपल्या मालकाशी निस्वार्थीच प्रेम करत असतो. हे प्रेम शुद्ध असते' असेही ते म्‍हणाले.

मागील वर्षी मुख्यमंत्री बोम्मई यांच्या कुत्र्याचे मागील वर्षी निधन झाले. नेमके हा चित्रपट पाहताना त्यांच्या लाडक्या स्नुबी याची आठवण झाली. त्यामुळे त्यांच्या कुत्र्याच्या आठवणींने ते गहिवरले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. '७७७ चार्ली' या चित्रपटात अभिनेत्री रक्षित शेट्टी (Actor Rakshit Shetty) यांनी यात प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पाहून मँगलोर पोलिसांनी (Mangalore Police) आपल्या शोधपथकातील नव्या कुत्र्याचे नाव देखिल चार्ली असे ठेवले आहे. हा चित्रपट हिंदी भाषेसह अन्य पाच भाषेमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT