Latest

Chhattisgarh Election Result Live | छत्तीसगडच्या मतमोजणीत कॉंग्रेस-भाजपमध्ये ‘टी-20’ सारखा ‘थरार’

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या अडीच तासात क्रिकेट 'टी-20' मधील थरारासारखी आकडेवारी समोर येत आहे, राज्यात विधानसभेच्या ९० जागा आहेत. यापैकी ४५-४५ जागांवर भाजप आणि कॉंग्रेस आघाडीवर आहे. चार राज्य़ांपैकी सर्वाधिक लक्षवेधी मतमोजणी याच राज्याची ठरली आहे, कारण काही मिनिटांमध्येच दोन्ही पक्ष मतमोजणी समांतर वाटचाल करत आहे. तर यानंतर एक किंवा दोन जागांवर आघाडी घेताना दिसत आहे. यामुळे संपुर्ण देशाचे लक्ष    छत्तीसगड विधानसभा निकालाकडे लागलं आहे. (Chhattisgarh Election Result Live)

छत्तीसगडमध्ये प्रत्येक मतगणना केंद्राने त्रिस्तरिय व्यवस्था केली आहे. छत्तीसगडमध्ये ९० जागांच्या विधानसभा जागांसाठी ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर  दोन टप्प्यात मतदान झाले होते. आज मतमोजणी होत आहे. त्यात राज्यातील 76.31 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 2003 ते 2018 अशी सलग 15 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला यावेळी राज्यातील जनता संधी देईल, अशी आशा आहे. दुसरीकडे, काँग्रेस राज्यात पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने केलेले काम जनतेला आवडले असून राज्यात पुन्हा एकदा त्यांचेच सरकार स्थापन होणार आहे, अशी काँग्रेसला आशा आहे.

Chhattisgarh Election Result Live | जनता जनार्दनला सलाम : भूपेश बघेल

छत्तीसगडमध्ये  गेली पाच वर्षे भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी आज  (दि.३) मतमोजणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, " आज मतमोजणीचा दिवस आहे. जनता जनार्दनला सलाम. सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा."

छत्तीसगडमध्ये एक्झिट पोल संस्थांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. येथे गेली पाच वर्षे भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.