Latest

OBC Reservation : तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, छगन भुजबळांची जरांगेंवर जहरी टीका

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडत आहे. (OBC Reservation) यावेळी छगन भुजबळ म्हणाले, आज गोपीनाथ मुंडे असते तर संकटामागून संकटे आली नसती. गोपीनाथ मुंडे यांची आठवण त्यांनी आवर्जुन काढली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षाबद्दल ऊहापोह घेतला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर निशाणा साधला. (OBC Reservation)

संबंधित बातम्या – 

भुजबळ म्हणाले, 'शरद पवारांना ओबीसींना आरक्षण दिलं. आता मराठा समाजाचे नवे देव झालेत. दगडाला शेंदूर फासून देव कुठे झाला? यावेळी त्यांनी नाव न घेता जरांगे-पाटलांवर निशाणा साधला. कुणाचं खाताय, कुणाचं खाताय? की तुझं खातोय का? तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी भाकरी तोडत नाही. असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. आमची लेकरं बाळ आमची लेकरंबाळ ही दोनचं वाक्य येतात. का आमची लेकंर बाळं नाहीत का? आजवर मराठा नेत्यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली. अरे मराठा तरुणांनो, याच्या मागे कुठे लागलात?'

ते म्हणाले, ओबासी आरक्षाणाचा आदेश केंद्राने दिला, शरद पवार यांनी तो मान्य केला. मराठा समाज अवैधपणे ओबीसी आरक्षणात शिरतोय. आरक्षण म्हणजे काय हे तर आधी समजून घ्या. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही.

७० पोलिस काय पाय घसरुन पडले?

भुजबळ म्हणाले, पोलिसांची बाजू आलीच नाही, पोलिसांवर हल्ला झाला. पोलिसांनी नाईलाजाने लाठीमार केला. लाठीचार्जमध्ये ७० पोलिस जखमी झालेत. ७० पोलिस काय पाय घसरुन पडले? महिला पोलिसांचे म्हणणे ऐकून घ्या. लाठrचार्जनंतर जरांगे घरात पडून होते. आमदार प्रकाश सोळंकेच्या घरी पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आले. सोळंकेंच्या घरातही लेकरं बाळ होती. सोळंकेंच्या घरावर हल्ला करताना कोडवर्ड्सचा वापर झाला. महिला पोलिसांनाही मारहाण झाली.

गावबंदीचे फलक हटवा

गावागावातले गावबंदीचे फलक पोलिसांनी हटवावे. आमदार, मंत्र्यांना गावबंदी, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर दिलाय?जशास तसं उत्तर द्यावं लागेल. हम आह भरते है तो बदनाम हो जाते है… अशी शायरी करत त्यांनी जातनिहाय जनगणना ताबडतोब झाली पाहिजे, अशी मागणी केली.

समाज समजातलं वितुष्ट मी कधी लावलं? दलित, मुस्लिम सगळे एकवटू, दादागिरी बंद करू, शांतपणाने उत्तर द्यायचं असे म्हणत त्यांनी 'मुश्किलों से भागना आसान होता है…' ही शायरी सादर केली. ओबीसी आता गप्प बसणार नाही, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT