

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला (दि.१६) दादर येथील त्यांच्या स्मृतिस्थळ येथे उपस्थित राहून त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रा. मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक समाधान सरवणकर, विभागप्रमुख सौ. प्रिया गुरव- सरवणकर आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे समोर आले आहे. या दोन्हा गटात राडादेखील झाला.