Latest

Chennai Rape Case : ‘हिंसक विरोध केला नाही याचा अर्थ सेक्ससाठी संमती नव्हे’ : न्यायालय

मोहसीन मुल्ला

चेन्नई; पुढारी ऑनलाईन : १९ वर्षांपूर्वी तामीळनाडूमध्ये २९ वर्षांच्या युवकाने एका तरुणीवर बलात्कार केला. या गुन्ह्यातील आरोपी आता ४८ वर्षांचा आहे, त्याने लग्नही केले असून त्याला २ मुले आहेत. तर पीडितेचे फार पूर्वीच निधन झालेले आहे. अनेक महिने आरोपीने मद्रास उच्च न्यायालयात दाखल केलेल्या (Chennai Rape Case) याचिकेवर सुनावणी सुरू होती. या तरुणीने हिंसक विरोधक केला नव्हता, त्यामुळे शरीर संबंधाना तिची संमती होती, असा अरोपीचा दावा होता. तर सरकार पक्ष मृत पीडितेच्या बाजूने केस लढवत होते. 

गेल्या आठवड्यात या खटल्याचा निकाल लागला असून उच्च न्यायालयाने आरोपीला सत्र न्यायालयाने सुनावलेली सात वर्षांची शिक्षा आणि दंड कायम ठेवला आहे.

पीडितेने हिंसक विरोध केला नाही, याचा अर्थ शरीर संबंधांना समंती होती, असा होत नाही, असा स्पष्ट निर्वाळा मद्रास उच्चन्यायालयाने देत, आरोपीची शिक्षा कायम केलेली आहे. न्यायमूर्ती भारत चक्रवर्ती यांनी हा निकाल दिला आहे.

अशा प्रकरणात निकाल देताना आपण पीडितेच्या जागी आहोत, हे विचार करून मग निर्णय दिला पाहिजे, असेही त्यांनी म्हटलेले आहे. 

या प्रकरणात न्यायमूर्तीनी विविध कायदेशीर बाबींचा उहापोह केला असल्याने हा निकाल बलात्कारांतील खटल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 

Evidences Act बद्दल महत्त्वाचा खुलासा (Chennai Rape Case)

लैंगिक अत्याचार

Evidences Act सेक्शन १४४ A नुसार जर बलात्काराच्या गुन्ह्यात पीडितेने तिची संमती नव्हती, असा जबाब दिला असेल तर तो ग्राह्य मानला जातो. पण तिची संमती होती, असे तर आरोपीचे म्हणणे असेल तर ते पुराव्यानिशी सिद्ध करून देण्याची जबाबदारी आरोपीवर येते. निव्वळ पीडितेने हिंसक विरोध केला नाही, किंवा सुटकेसाठी गंभीर प्रयत्न केले नाहीत याचा अर्थ तिची संमती होती असा होत नाही, असे न्यायमूर्तींंने म्हटले आहे. 

या प्रकरणात आरोपीने त्याचे पीडितेशी प्रेमसंबंध होते, पण तिच्या भावाने दोघांना संबंधावेळी पकडले होते, त्यातून दबावापोटी गुन्हा नोंद केला गेला, असा बचाव सादर केला होता. 

"गुन्हा घडल्यानंतर १९ वर्षांनंतरही परिस्थितीची दाहकता आपण पाहात आहोत. पीडिता गुन्ह्यानंतर जिवंत होती आणि काही वर्षांपूर्वी तिचे निधन झाले. तिच्या शरीरावर आणि मनावर याचा काय परिणाम झाला असेल याचा आपण विचार केला पाहिजे. आरोपीला लहान वयात तुरुंगात जावे लागले आणि त्याला दारूचे व्यसनही जडलेले आहे. त्याच्या बायको आणि मुलांना नाहक या सर्वांचा त्रास सोसावा लागणार आहे. पीडितेला माणूस म्हणून वागणूक न देण्याची आरोपीची भ्रष्ट मानसिकता दिसून येते," असे ही न्यायमूर्तींनी म्हटलेले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT