Latest

अल कायदाने दिलेल्‍या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह इतर मोठ्या शहरांमध्‍ये दक्षतेचा इशारा

नंदू लटके

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या संदर्भात केलेल्या टिप्पणीचे आखाती जगतात तीव्र पडसाद उमटले होते. कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाने भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची धमकी दिली होती. याची गंभीर दखल सुरक्षा संस्थांनी घेतली असून, मुंबई, दिल्ली तसेच उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये दक्षतेचा इशारा दिला आहे.

ज्या ठिकाणी प्राधान्याने दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे, त्यात विमानतळे, रेल्वे आणि मेट्रो स्थानके, गर्दीच्या बाजारपेठा यांचा समावेश असल्याचे बुधवारी सूत्रांकडून सांगण्यात आले. एखादा संशयास्पद व्यक्ती दिसला तर त्याची माहिती लगेच सुरक्षा संस्थांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अल कायदाने 6 जून रोजी भारतात हल्ले करण्याबाबतचे धमकीचे निवेदन जारी केले होते. ठिकठिकाणी आत्मघाती हल्ले करुन-बदला घेतला जाईल, अशी धमकी अल कायदाने दिली होती.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT