Latest

CCTV viral video : ऐकावे ते नवलचं! माकडाने चोरले तब्बल १३ सीसीटीव्ही कॅमेरे….

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क: सोशल मीडियावर  सीसीटीव्ही कॅमरे चोरणार्‍या एक माकडाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका प्लायवूड शॉपमधून गेल्या काही दिवसांपासून सीसीसीटीव्ही कॅमेरे चोरीस जात होते. त्यामुळे दुकानदार खूपच नाराज झाला होता. ही घटना आहे कन्याकुमारीमधील. अखेर चोर (CCTV viral video ) कोण आहे सापडलं. चोर निघाला एक व्यक्ती नाही तर माकड आहे. वाचा सविस्तर बातमी

CCTV viral video : १३ सीसीटीव्ही चोरीस 

कन्याकुमारीमध्ये एका दुकानात सीसीटीव्हींची चोरी होत होती. पण चोराचा चोराचा चेहरा समोर येत नव्हता. मात्र, एका व्हिडीओमध्ये सीसीसीटीव्ही कॅमेरे चोरणार्‍याची छबी कैद झाली. चोराला पाहून दुकानदार खूपच हैराण झाला. हा चोर कोणी माणूस नव्हता, तर ते एक माकड होते. दुकानातील सीसीसीटीव्ही कॅमरे चोरी होत असल्याने दुकानदाराने अनेक वेळा कॅमेरे बदलले. मात्र, सिग्नल तुटण्यापूवी एका कॅमेरात माकडाची करामत कैद झाली. माकड कॅमेरे (मर्कटलिला) चोरी करत असल्याचे पाहून अनेकांना हसूच आवरेनासे झाले. हे चोरी करणारे माकड कॅमेरे काढण्यासाठी आपली संपूर्ण ताकद वापरत असल्याचे समोर आले आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले.

सीसीटीव्ही चोरणाऱ्या माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सीसीटीव्ही काढतानाची त्याची धडपड पाहून लोकांना हसु आवरेना. सीसीटीव्ही मधील रेकॉर्ड झालेला चोर पाहून स्वतः दुकानदारालाही आश्चर्याचा धक्काही बसला आणि हसुही आलं.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT