Latest

Aslam Shaikh : ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना कार्यक्रमात तलवारी दाखवणं पडलं महागात, गुन्हा दाखल

backup backup

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : ठाकरे सरकारमधील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख  (Aslam Shaikh) आणि भारतीय काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वांद्रे येथील रंगशारदा भवनमध्ये रविवारी (दि.२७) इम्रान प्रतापगढी यांच्या स्वागतासाठी आयाेजित कार्यक्रमात या नेत्यांनी हातात तलवारी घेत उंचावल्या होत्या. घटनेचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बे पोलीस आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्वीट करत आपण पोलिसात तक्रार केल्याचे सांगितले. वांद्रे तलवार घटनेच्या माझ्या तक्रारीवरून मंत्री अस्लम शेख, मंत्री वर्षा गायकवाड आणि इतर काँग्रेस नेत्यांविरुद्ध मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवला! अशी कंबोज यांनी ट्वीटच्‍या माध्‍यमातून दिली.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख (Aslam Shaikh) आणि इम्रान प्रतापगढी यांनी हातात तलवार घेत उंचावल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पोलीस याप्रकरणी तपास करत असल्याचे अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आले.

महाराष्ट्र काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या आढावा बैठकीत सहभागी होण्यासाठी प्रतापगढी मुंबईत आले होते. वर्षा गायकवाड या मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत तर अस्लम शेख मालाड पश्चिमचे प्रतिनिधित्व करतात यामुळे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT