Latest

Calcutta High Court : अनोळखी महिलेस ‘डार्लिंग’ संबोधणे हा लैंगिक छळच : उच्च न्यायालय

मोहन कारंडे

कोलकाता; वृत्तसंस्था : एखाद्या व्यक्तीने अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटले, तर तो लैंगिक छळ मानला जाईल. भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत त्याला तुरुंगात जावे लागेल आणि दंडही भरावा लागेल, असा महत्त्वपूर्ण निकाल कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) दिला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जय सेनगुप्ता म्हणाले की, आरोपी दारूच्या अथवा अन्य कोणत्याही नशेत असला, तरी त्याने एखाद्या अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटले, तर तो लैंगिक छळ मानला जाईल. न्यायमूर्ती सेनगुप्ता यांनी अपीलकर्ता आरोपी जनक रामची शिक्षा कायम ठेवली आहे. त्याने मद्यधुंद अवस्थेत पकडल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याला म्हटले होते की, डार्लिंग तू चालान काढायला आली आहेस का?

कोणत्याही अज्ञात महिलेला 'डार्लिंग' या शब्दाने संबोधता येणार नाही. हे अपमानास्पद असून आरोपीचे शब्द लैंगिक टिप्पणी आहेत. आरोपीने न्यायालयात दावा केला की, टिप्पणीच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. मात्र, त्याचे हे कारण न्यायालयाने फेटाळून लावले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT