Agar Malwa Crime News : न्यायालयीन सुनावणीदरम्यान वकीलाने न्यायाधिशावर फेकले चप्पल, गुन्हा दाखल | पुढारी

Agar Malwa Crime News : न्यायालयीन सुनावणीदरम्यान वकीलाने न्यायाधिशावर फेकले चप्पल, गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगर माळवा (Agar Malwa) येथे एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान वकिलाला राग अनावर झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रागाच्या भरात त्याने केलेले कृत्य हे न्यायालयाचा अवमान करणारे ठरले आहे. न्यायालयीन सुनावणी दरम्यान त्याने थेट न्यायाधीशाच्या दिशेने चप्पल फेकले. या संपूर्ण प्रकारात न्यायाधिशांना दुखापत झाली आहे. पोलिसांनी संबंधित प्रकरणातील वकीलास सरकारी कामात अडथळा आणण्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. Crime News

अमर उजाला या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश येथील आगर माळवा येथे ही घटना सोमवारी (दि. २२) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेतील संबंधित वकिलाचे नाव नितीन अटल अस आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ते इतके संतप्त झाले की त्यांनी न्यायाधीशांवर चक्क पायातले बूट फेकले. या कृत्यांनतर संबंधित वकील घटनास्थळावरून पळून गेले. वकिलाने केलेल्या हल्ल्यात न्यायाधीशांच्या कानाला दुखापत झाली आहे. (Agar Malwa Crime News)

आगर पोलिस ठाण्यात एका सरकारी कर्मचारीने याबाबत एफआयआर दिली आहे. आगर येथील प्रथम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांचे पत्र पोलिसांसमोर सादर केले. यासोबत अजय जाटव आणि वकील कौसर खान यांच्या प्रमाणित साक्षीची कागदपत्रेही जोडण्यात आली आहेत. या आधारे पोलिसांनी नितीन अटल यांच्या विरोधात आयपीसी कलम ३३२, ३५३, २९४ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

नितीन अटल यांनी या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडिओही जारी केला आहे. आगर येथील न्यायाधीश प्रदीप दुबे यांच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रार मागे घेण्यासाठी दबाव निर्माण केला जात असून ही संपूर्ण घटनाही सुनियोजित कट रचून घडवण्यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button