Latest

Marathwada University: विद्यापीठाच्या नावात औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठवाडा येथील विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (दि.१०) मान्यता देण्यात आली. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावातील औरंगाबाद ऐवजी आता छत्रपती संभाजीनगर असा बदल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. Marathwada University

Marathwada University : राज्य मंत्रिमंडळ बैठकातील इतर निर्णय

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती.
( महिला व बालविकास)

सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार.
( जलसंपदा विभाग)

सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये
(विधि व न्याय विभाग)

पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.
(महसूल विभाग)

फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार
( परिवहन विभाग)

भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन
( महसूल व वन विभाग)

विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता
( उच्च व तंत्र शिक्षण)

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT