Latest

 Bread Poha :  ‘ब्रेड पोहे’ कसे बनवाल? जाणून घ्‍या…

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :

ब्रेड टोस्ट, ब्रेड पकोडा किंवा सॅंडविच खूपवेळा खाल्लं असेल;  पण कधीतरी हटके खायला काय हरकत आहे.  (Bread Poha) अनेकवेळा ब्रेड शिल्‍लक राहताे. आपण ताे मिसळ, चहा, वड्याबरोबर खातो, त्याचे गुलाबजामही बनवतो;  पण कधी ब्रेडचे पोहे खाल्लेत का? चला तर मग जाणून घेवूया झटपट बनणारी रेसिपी ब्रेड पोहे.

कमी वेळेत आणि कमी साहीत्यात ब्रेड पोहे

Bread Poha ब्रेड पोहे – साहित्य

ब्रेड पोहे बनविण्याची पद्धत

१) गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये दाेन चमचे तेल घ्‍या. मंद आचेवर ते गरम करा

२) तेल गरम झाल्‍यानंतर त्यामध्ये मोहरी घाला. ती  परतून घ्या.

३) भाजलेल्या मोहरीत हिरव्या मिरचीचे  बारीक तुकडे घाला. ते चांगले भाजून घ्या.

४) या मिश्रणात ब्रेडचे मध्यम आकाराचे  तुकडे घाला. ते परतवत रहा.

५) थोड्यावेळाने यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ घाला.

६) हे भाजलेले ब्रेड प्लेटमध्ये काढून घ्या.

७) त्‍यावर बारीक केलेला कांदा, टोमॅटो आणि शेव घाला.

८)आंबटपणा आवडतं असेल तर त्‍यावर लिंबु पिळुन घ्या.

तुम्हाला शेंगदाणे आवडतं असतील तर, तुम्ही ते तेल गरम झाल्यानंतर घालुन, थोडावेळ भाजून वेगळा चव आणू शकता.

झाले तयार झटपट असे ब्रेड पोहे. मग करताय ना या संडेला नाष्ट्याला  वेगळेपणा आणणारे आणि कमी वेळेत, कमी साहित्यात होणारे  ब्रेड पोहे. (Bread Poha)

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT