Latest

Moeen ali : ‘आयपीएल’पूर्वी मोईन अलीने पाडला षटकारांचा ‘पाऊस’, बीपीएलमध्‍ये धमाकेदार फलंदाजी

नंदू लटके

ढाका : पुढारी ऑनलाईन
इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल) लिलावापूर्वी इंग्‍लंडचा फलंदाज मोईन अलीने ( Moeen ali ) शुक्रवारी बांगलादेश प्रीमिअर लीगमध्‍ये ( बीपीएल) धमाकेदार कामगिरी केली. कोमिल्‍ला व्‍हिटोरिअन्‍सकडून खेळताना त्‍याने खुलना टागयर्सच्‍या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्‍याने एकुण ७५ धावांची खेळी केली. मात्र यातील ५८ धावा केवळ १० चेंडूत ठोकल्‍या.

खुलना टागयर्सने नाणेफेक जिंकला. कोमिल्‍ला व्‍हिटोरिअन्‍सला फलंदाजी दिली. मात्र हा निर्णय मोईन अलीने चुकीचा ठरवला. त्‍याने  ९ षटकार, १ चौकार लागवत केवळ १० चेंडूत ५८ धावा केल्‍या. तर ३५ चेंडूत एकुण ७५ धावांची खेळी केली. केवळ फलंदाजीतच नाही तर मोईन अली याने ( Moeen ali ) गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. त्‍याने चार षटकांमध्‍ये २० धावा देत २ बळीही घेतले.

आयपीएलमध्‍ये मोईन अली हा चेन्‍नई सुपर किंग्‍सच्‍या संघात आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने मोईन अलीवर विश्‍वास दाखवला. चेन्‍नई सुपर किंग्‍स संघात स्‍थान मिळणे हे मी माझे भाग्‍यच समजतो, असे त्‍यानं म्‍हटलं होतं. आयपीएल २०२२साठीही चेन्‍नई सुपर किंग्‍जने मोईन अलीवर ८ कोटींची बोली लावत त्‍याला संघात घेतले आहे.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT