Latest

सांगली: महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्यावर बूटफेक

अविनाश सुतार

सांगली : पुढारी वृत्तसेवा : गुंठेवारी नियमितीकरणाची फाइल मंजूर होण्यास विलंब होत असल्याने एका व्यक्तीने महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या दिशेने बूट भिरकावला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी महापालिकेचे कामकाज बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. या प्रकरणी कैलास काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कैलास काळे याने 2012 मध्ये गुंठेवारी नियमितिकरणाची फाइल दाखल केली होती. मात्र अद्याप ती मंजूर झाली नसल्याने लोकशाही दिनी ही तक्रार मांडली होती. त्यावर सुनावणी सुरू असतानाच तक्रारदार यांनी आयुक्तांशी वाद घालत पायातील बूट काढून फेकून मारला. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी काळे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उपस्थितांनी काळे यांना पकडून ठेवले आणि पोलिसांना बोलावले. शहर पोलिसांनी काळे यास ताब्यात घेतले. ही बातमी कळताच सर्व कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून निदर्शने केली. पोलीस स्टेशन बाहेर दोन्ही बाजूंचे समर्थक जमा झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT