पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि नेता राघव चड्ढा यांच्या विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात राजस्थानच्या उदयपूर येथे पार पडणार आहे. ( Parineeti-Raghav wedding ) हा विवाह २३ आणि २४ सप्टेबर रोजी धुमधडाक्यात पार पडणार आहे. या शाही विवाहासाठी सिक्युरिटी गार्डपासून ते पाहुण्याच्या स्वागत आणि पंचपकवान्नांपर्यतची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
संबधित बातम्या
अभिनेत्री परिणीती – राघव चड्ढा यांच्या विवाहासाठी प्रसिद्ध राजस्थानमधील उदयपूर येथील हॉटेल 'द लीला पॅलेस' ची निवड करण्यात आली आहे. दोघाचं लग्न अगदी रॉयल पद्धतीने होणार आहे. दरम्यान जवळच्या सुत्रांनी लग्नाची तयारी अंतिम टप्यात आली असून सर्व काही व्यवस्थित पार असल्याचे सांगितले आहे. या हॉटेलमधील सूटची डायनिंग रूम येथे परिणीतीच्या चुडा भरण्याचा समारंभ होणार आहे. ही रूम संपूर्ण काचेचा महाल आहे. या सूटचे एका रात्रीचे भाडे ९ ते १० लाख रुपये आहे. तसेच लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी ८ स्वीट आणि ८० रूम बुक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या चुडा भरण्याचा समारंभ होणार आहे. सायंकाळी संगीताचे आयोजन केले आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे, २४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता राघवची सेहराबंदी होणार आहे. राघव लग्नातील पाहुण्यांसोबत बोटीत बसून हॉटेल 'लीला पॅलेस'मध्ये दमदार एन्ट्री होणार आहे. यात दिवशी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास दोघेजण फेरी घेवून लग्न बंधानात अडकणार आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी ६ नंतर निरोप समारंभ आणि रात्री ८ वाजता डिनर होणार आहे.
या लग्नासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. लग्नाच्या दिवशी दोन दिवसांमध्ये कोणत्याही व्यक्तीला हॉटेलमध्ये फोन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. ५० हून अधिक लक्झरी वाहनांसह १२० हून अधिक लक्झरी टॅक्सी बुक करण्यात आल्या आहेत. लग्नाच्या रिसेप्शन मेनूमध्ये मुख्यतः पंजाबी पदार्थांसोबत इटालियन आणि फ्रेंच समावेश करण्यात आला आहे. या सर्वावरून राघव आणि परिणीतीच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली असून तारीख जवळ आल्याची माहिती मिळतेय. याआधी दोघांचा साखरपुडा पार पडला आहे. ( Parineeti-Raghav wedding )
हेही वाचा :