Latest

Daisy Shah : ब्लॅक मोनोकिनीमध्ये डेजी शाहची दिसली हॉट फिगर ❤️❤️❤️

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

सलमानची अभिनेत्री डेजी शाहने (Daisy Shah) हॉट ॲण्ड सिझलिंग फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. समुद्रात डेजी शाह (Daisy Shah) खूपच गॉर्जियस दिसतेय. ब्लॅक मोनोकिनीत तिने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. आपल्या बोल्डनेसमुळे डेजी सध्या चर्चेत आहे.

सोशल मीडियावर डेजीचे लाखो फॅन्स आहेत. डेजीने सलमान खानसोबत काम केलं होतं. डेजीसाठी चित्रपटांत येणं इतकं सहज नव्हतं. इथंवर पोहोचण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली. एक वेळ अशी होती की, ती बॅक डान्सर म्हणून काम करत होती. आज डेजी कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.

डेजीचा जन्म २५ ऑगस्ट, १९८४ रोजी गुजराती परिवारात झाला. तिने आपल्या करिअरची सुरूवात कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यासोबत असिस्टंट म्हणून काम केलं होतं.

डेजीची एकूण संपत्ती १८५ कोटींच्या जवळपास आहे. तिच्या कमाईची साधने वेगवेगळी आहेत. डान्सिंगमधून ती चांगली कमाई करते. याशिवाय ती मॉडेलिंग, जाहिरीती आणि अभिनयातून चांगले पैसे कमवते. मीडिया रिपोर्ट्िनुसार, डेजी एका चित्रपटासाठी ३ कोटी रुपये घेते.

डेजी शाहकडे मुंबईमध्ये स्वत:चं घर आहे. कुर्लामध्ये ३ बीएचके फ्लॅट आहे. तिच्याकडे मर्सिडिज बेंज कार आहे. ही कार तिला सलमानने गिफ्ट केलीय. तिची किंमत ९० लाख रुपये आहे. त्याचसोबत एक रेंज रोवरदेखील आहे. तिची किंमत ७० लाख रुपये आहे.

कमालीची डान्सर

डेजीने सलमान खानच्या गाण्यांमध्ये बॅक स्टेज डान्सर म्हणून काम केले आहे. डान्ससोबतचं तिने मॉडेलिंग सुरु केलं होतं. ती हमको दिवाना कर गएमध्येही दिसली होती. अभिनेत्रीने साऊथ चित्रपटांमध्येही अभिनय केला . तिने २०११ मध्ये कन्न्ड चित्रपट भद्रामध्ये काम केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. हिंदी चित्रपटामध्ये जय हो शिवाय डेझी हेट स्टोरी ३ आणि रेस ३ मध्येही तिने काम केले आहे.

हेदेखील वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT